Download App

महायुतीने लोकहिताच्या योजना सुरू केल्याने, काही लोकांना पोटशूळ उठलाय; मंत्री विखेंचा राज ठाकरेंना टोला

Radhakrishn Vikhe Patil यांनी महायुतीच्या योजनांवर केलेल्या टीकेवरून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहेे.

Radhakrishn Vikhe Patil Criticize Raj Thackeray on Mahayuti scheme : महायुती सरकारच्या योजना लोकांच्या हितासाठी सुरू केल्या असून कोणतीही योजना बंद केलेली नाही. शेतकरी कर्जमाफीचा विषय महायुतीच्या जाहीरनाम्यात असल्याने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याबाबत निश्चित विचार होईल. तसेच महायुतीची एकही योजना बंद पडलेली नाही. मात्र काही ठराविक लोकांना पोटशूळ उठला आहे. राज्याच्या जनतेन ज्यांना नाकारल त्यांचीच अधिक उठाठेव सुरू आहे. अस यावेळी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

बाहेर मर्डर करून थकलेले जेलमध्ये मर्डर करणार नाही कशावरून? कराडच्या जेलमधील मारहाणीवर धसांचा सवाल

लोणी बुद्रुक येथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी .माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनी विखे पाटील यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी जेष्ठ नागरीक युवक उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, महायुती सरकारने सामान्य माणूस डोळ्या समोर ठेवून योजनांचे निर्णय केले आहेत.प्रत्येक वर्षात योजना यशस्वीपणे राबवणे हे महायुतीचे धोरण असल्याचे सांगून, निवडणुकीत केलेल्या संकल्पाची पूर्तता करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निश्चित होईल.

वाल्मिक कराडने चप्पल घालणं सोडलं तर बबन गितेने दाढी वाढवली; कारण काय?, वाचा खास स्टोरी

महायुती सरकारने यापुर्वी एक रुपयात पीक विमा योजना,कापूस सोयाबीनला अनुदान, लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.या योजनांची अनुदान लाभार्थीच्या खात्यात वर्ग झाली आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व हप्ते मिळत असल्याकडे लक्ष वेधून महायुतीची एकही योजना बंद पडलेली नाही.मात्र काही ठराविक लोकांना पोटशूळ उठला आहे.

“झापुक झुपूक” मध्ये दिसणार ‘या’ उत्कृष्ट कलाकारांची दमदार फळी; पोस्टरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला !

राज्याच्या जनतेन ज्यांना नाकारल त्यांचीच अधिक उठाठेव सुरू असल्याची बोचरी टिका करून शेतकऱ्यांना कर्जमाफ करण हे महायुतीच्या जाहीरनाम्यात असून त्याची पूर्तता होईल असे सुतोवाच त्यांनी केले.विरोधी पक्षनेता निवडण्यात ज्यांचे एकमत होत नाही त्यांनी महायुतीची उठाठेव करण्यापेक्षा स्वताचे घर आधी बघावे आशी टिका मंत्री विखे पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात केली.

follow us