बाहेर मर्डर करून थकलेले जेलमध्ये मर्डर करणार नाही कशावरून? कराडच्या जेलमधील मारहाणीवर धसांचा सवाल

Suresh Dhas on Walmik Karad And Sudarshan Ghule Beaten In Beed Jail In Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख खंडणी आणि हत्या प्रकरणात बीडच्या जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड याला तुरूंगात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या हल्ल्याबाबत जेल प्रशासनाने अद्याप दुजोरा दिलेला नाही. मात्र यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, परळीमध्ये आका विरूद्ध बबन गीते या दोन टोळ्या एकमेकांना संपवण्यासाठी टपलेल्या आहेत. त्यांनी एकमेकांना संपवण्यासाठी शपथ घेतल्या आहेत. त्यावरून त्यांच्यामध्ये जेलमध्ये देखील बाचाबाची झाली.
काय म्हणाले सुरेश धस?
परळीमध्ये आका विरूद्ध बबन गीते या दोन टोळ्या एकमेकांना संपवण्यासाठी टपलेल्या आहेत. त्यांनी एकमेकांना संपवण्यासाठी शपथ घेतल्या आहेत. त्यावरून त्यांच्यामध्ये जेलमध्ये देखील बाचाबाची झाली. कराड आणि त्यांच्या टोळीवर गीते गॅंगमदील महादेव गीते धावून गेले होते. मात्र प्रशासन नेमकी घटना सांगत नसलं तरी देखील मला माहिती मिळाली आहे की, ही मारामारी फार झाली नसली तरी एकमेकांवर धावून गेले. त्यावेळी जेलचे कर्मचारी तेथे गेल्याने हा प्रकार थांबला. दरम्यान महादेव गीते हा आरोपी बापू आंधळे या सरपंचाच्या हत्येच्या आरोपाखाली जेलमध्ये आहे. मात्र तो म्हणत आहे की, मला यात अडकवलं गेलं आहे. तसेच त्याने स्वत: पोलिसांच्या सुपूर्द केले आहे की, त्याला अटक झाली आहे. याबाबत मला व्यवस्थित माहिती नसल्याचं धस यांनी म्हटलं आहे.
वाल्मिक कराडने चप्पल घालणं सोडलं तर बबन गितेने दाढी वाढवली; कारण काय?, वाचा खास स्टोरी
त्यामुळे बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकत. कारण मला मिळाली आणखी माहिती अशी की, आकांना जेलमध्ये स्वतंत्र जेवण पुरवठा होत आहे. आकाकडे एक स्पेशल फोन आहे. ज्यावरून आकांचं कनेक्शन थेट परळीतील एका फोनशी होतं. त्यामुळे या सर्व व्हिआयपी ट्रीटमेंटवर एसपींनी वचक ठेवायला हवा. ते केवळ माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर कर्मचाऱ्यांना निलंबित करत आहेत त्याऐवजी त्यांनी जेलला भेट द्यावी ते हेडक्वार्टरमध्येच असतात.
तसेच जलमध्ये जर मारामाऱ्या होत असतील तर बाहेर मर्डर करून थकलेले जेलमध्ये मर्डर करणार नाही कशावरून असा सवाल यावेळी धस यांनी केला आहे. त्यामुळे जेल प्रशासनाने या दोन वाद असलेल्या टोळ्यांना एकमेकांपासून दूर ठेवावे. कारण त्यांचा वाद हा जेलमधील फोनवरून झाला आहे. तेथे फोन देखील असल्याची माहिती मला जेलरनेच दिली असं देखील यावेळी धस म्हणाले.
नेमकं प्रकरण काय आहे?
संतोष देशमुख खंडणी आणि हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेला वाल्मिक कराड याला तुरूंगात मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघं सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत. (Ghule ) तसंच, संतोष देशमुख हत्याकांडातील इतर आरोपीही त्याच तुरूंगात आहेत. तर बाजूच्या, दुसऱ्या बॅरेकमध्ये अक्षय आठवले नावाचा आरोपी असून तोही मकोका कायद्याअंतर्गत शिक्षा भोगत आहे.
मोठी बातमी! बीड जिल्हा कारागृहात जोरदार राडा, वाल्मिक कराड अन् सुदर्शन घुलेला मारहाण
त्याचबरोबर महादेव गीते हा परळीतील आणखी एक आरोपी आहे. ते दोघे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले या दोघांच्या अंगावर धावून गेल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत जेल प्रशासनाने अद्याप दुजोरा दिलेला नाही. सुरूवातीला त्यांची बाचाबाची झाली. नंतर त्या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, जेल प्रशासनाने यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दोन गटातले दोन्ही आरोपी आमनेसामने यापूर्वी आले होते. दादा खिंडकर या मारहाणीतील आरोपीनेही अशाच प्रकारचा आरोप केला होता.