कुकडीचे पाण्यावरील राजकीय अडचणी निर्माण केल्‍या मात्र…मंत्री विखेंचा रोख कोणावर ?

Radhakrishna Vikhe Patil : भंडारदारा, निळवंडे, मुळा आणि कुकडी प्रकल्पातील पाण्याचे सुयोग्य नियोजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrushna Vikhe Patil

Radhakrushna Vikhe Patil

Radhakrishna Vikhe Patil : भंडारदारा, निळवंडे, मुळा आणि कुकडी प्रकल्पातील पाण्याचे सुयोग्य नियोजन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याने यंदाच्या वर्षी जिल्ह्याला पाणी टंचाईची तीव्रता भेडसावली नाही. उन्हाच्या तीव्रतेतही टंचाईग्रस्त गावांना आवर्तनाच्या माध्यमातून पाण्याचा मिळालेला दिलासा प्रशासनाचा ताण कमी करणारा ठरला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याने नेहमीच पाण्याचा संघर्ष अनुभवला आहे. अनेक वेळा सरासरी इतकाही पाऊस न होण्याचे प्रसंग जिल्ह्याने अनुभवले. त्यातच धरणात पाणी असूनही आवर्तनाचे नियोजन न झाल्याचे परीणाम सुध्दा जिल्ह्याला भोगावे लागले. समन्यायी पाणी वाटप कायद्यामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या संघर्षाला जिल्‍ह्याने मागील काळात तोंड दिले. यंदा मात्र जिल्ह्यात पावसाने सरासरी इतकी हजेरी लावल्याने भंडारदारा, निळवंडे, मुळा धरणात पाण्याचा साठा क्षमते इतका उपलब्ध झाला. योगायोगाने यावर्षी जलसंपदा विभागाचे मंत्रीपद राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रुपाने जिल्ह्याला मिळाल्याने पाण्याच्या संदर्भात अतिशय संवेदनशीलपणे धरणातील पाण्याचे नियोजन योग्य आणि वेळनुसार झाल्याचा अनुभव आला.

सद्य परिस्थितीत उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. प्रशासकीय स्तरावर टंचाई आराखड्याचे नियोजन सुरू झाले असले तरी जिल्हयातील धरणामध्ये उपलब्ध असलेला पाणी साठा आणि अद्यापही लाभक्षेत्रातील ओढे, नाले, तलावांमध्ये पाणी साठा असल्याने गावांमधून पाण्याची मागणी नाही. जलसंपदा विभागाने मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक धरणाच्या लाभक्षेत्रातील पाण्याचे आवर्तनाचे सुध्दा शेतक-यांच्या मागणीप्रमाणे झाल्याने त्याचा लाभ शेती क्षेत्राबरोबरच कालव्‍यांवर अवलंबून असलेल्‍या पिण्‍याच्‍या पाण्‍याच्‍या योजनांना झाल्‍यामुळे पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई भासली नाही.

पिण्‍याच्‍या पाण्‍याचे सुयोग्‍य नियोजन झाल्‍याने अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे असलेली टॅकंरची मागणी यंदाच्‍या वर्षी घटल्‍याचे दिसते. यामुळे प्रशासनाचा तान थोड्याफार प्रमाणात कमी झाला. पर्यायाने शासनाचा आर्थिक भुर्दंड वाचला आहे. तरीही प्रशासनाने तालुका निहाय टंचाई परिस्थितीला सामोरे जाण्‍याची पुर्व तयारी करुन ठेवली आहे. सद्य परिस्थितीत जिल्‍ह्यातील धरणांच्‍या लाभक्षेत्रातशेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी रब्‍बी हंगामासाठी आवर्तन सुरु केल्‍याने याचाही दिलासा जिल्‍ह्यातील सर्वच तालुक्‍यातील शेती क्षेत्राला मिळाला आहे. उत्‍तर अहिल्‍यानगरचा विचार केला तर, भंडारदरा आणि निळवंडे या दोन्‍हीही धरण समुहातील पाण्‍याचा लाभ जिरायती भागाला मिळाला आहे. त्‍यात अधिक जमेची बाजू म्‍हणजे वर्षानुवर्षे निळवंडे कालव्‍यातून मागील दोन वर्षात आवर्तन वेळेवर सुरु झाल्‍याने उत्‍तर भागातील सहा तालुक्‍यातील दुष्‍काळी गावांना आता मोठा दिलासा मिळू शकला आहे.

लाभक्षेत्रातील शेवटच्‍या गावाला निळवंडे धरणाच्‍या पाण्‍याचा लाभ मिळावा म्‍हणून, मंत्री विखे पाटील यांनी विभागाच्‍या आधिका-यांच्‍या सहकार्याने केलेले अ‍चूक नियोजन यापुर्वी कधीही अनुभवास मिळाले नव्‍हते. त्‍यामुळे सध्‍या निळवंडे धरणाचे पाणी लाभक्षेत्रातील ओढ्या, नाल्‍यांच्‍या माध्‍यमातून सोडून गावातील तळ्यांमध्‍येही साठविले गेले. हे मागील ५० वर्षांच्‍या इतिहासात पहिल्‍यांदाच घडले असल्‍याने या भागातील शेती उत्‍पादन वाढण्‍यासही मदत झाली आहे.

यापुर्वी कुकडीचे पाणी अहिल्‍यानगर जिल्‍ह्यातील लाभक्षेत्राला मिळण्‍यात जाणीवपूर्वक राजकीय अडचणी निर्माण केल्‍या जात होत्‍या. मात्र जिल्‍ह्याकडे जलसंपदा विभाग आल्‍यानंतर प्रथमच कुकडीच्‍या कालवा सल्‍लागार समितीची बैठक ही अहिल्‍यानगर मध्‍ये झाली. त्‍यानंतर या लाभक्षेत्रातील आवर्तनाचे नियोजन झाले. सद्य परिस्थितीत कुकडी धरण समुहात २७.८९ टिएमसी इतका उपयुक्‍त पाणीसाठा उपलब्‍ध झाला. त्‍यानंतर पहिले रब्‍बी आवर्तन कुकडीच्‍या डाव्‍या कालव्‍यातून सोडण्‍यात आले. याचाही लाभ अहिल्‍यनगर जिल्‍ह्याला झाला. उन्‍हाळी आवर्तन डाव्‍या कालव्‍यातून व इतर कालव्‍यांसाठी प्रस्‍तावित करण्‍यात आले आहे.

यापुर्वी समन्‍यायी पाणी वाटप कायद्यामुळे भंडारदरा, निळवंडे, मुळा तसेच गोदावरी धरण समुहातून जायकवाडीला पाणी सोडण्‍याचा ताण नेहमीच जिल्‍हा प्रशासनावर असायचा. यामुळे राजकीय संघर्षही झाला. या कायद्याच्‍या बडग्‍यामुळे धरण समुहातून काही वर्ष पाणी सोडावे लागले. याची किंमत जिल्‍ह्याच्‍या शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात चुकवावी लागली. हक्‍काचे पाणी गेल्‍याने धरणातील पाणी साठ्यातही कपात झाली. त्‍यामुळ आवर्तनाच्‍या वेळापत्रकावरही परिणाम झाले.

सद्य परिस्थितीत निसर्गाने दिलेली साथ तसेच अहिल्‍यानगर आणि नाशिक जिल्‍ह्यातून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी जायकवाडीकडे झेपावल्‍याने जायकवाडी धरणात क्षमतेपेक्षा जादा साठा झाला. त्‍या भागालाही याचा दिलासा मिळाला. योगायोगाने जलसंपदा विभागाचे मंत्रीपद जिल्‍ह्याला मिळाल्‍याने मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपलब्‍ध पाण्‍याचे केलेले नियोजन जिल्‍ह्यासाठी हितकारक ठरले आहे. जिल्‍ह्याची तहाण तर भागलीच परंतू धरणातही पाणी साठा अध्‍यापही उपलब्‍ध आहे.

सन २०२५- २६ वर्षी जुन ते ऑक्टोबर या महिन्यांत भंडारदरा धरणावर ५५० मिमी इतका सरासरी पाऊस झालेला असुन, धरणात दिनांक १५ ऑक्‍टोंबर २०२५ रोजी खालील प्रमाणे पाणीसाठा उपलब्ध होता. त्यानुसार लाभधारक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खालील प्रमाणे आवर्तन देण्यात आली.

भंडारदरा – १०७३९ दलघफु व निळवंडे – ८०६४ दलघफु

(रब्बी हंगामात बिगरसिंचनासाठी १ व सिंचन/ बिगर सिंचनासाठी १ अशी दोन आवर्तन सोडण्यात आली. त्यात अनुक्रमे३१६ व १६०९ दलघफु पाणीवापर झाला. सद्यस्थितीत दि.१३.फेब्रुवारी २०२६ पासुन सिंचन/ बिगर सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले. तसेच निळवंडे धरणातुन आजपर्यंत कालव्यांकरीता १६६७ दलघफु पाणी वापर झाला.)

मुळा प्रकल्प – २१५०० दलघफु

रब्बी हंगामात मुळा डाव्या कालव्याकरीता 1 आवर्तन सोडण्यात आले. त्यात २१७ दलघफु पाणीवापर झाला. सद्यस्थितीत दि.२३ फेब्रुवारी २०२६ पासुन आवर्तन सोडण्यात आले आहे.)

आढळा-  १०६० दलघफु

(रब्बी हंगामात १ आवर्तन सोडण्यात आले. त्यात ८९ दलघफु पाणी वापर झाला. सद्यस्थितीत दि.२१ फेब्रुवारी २०२६ पासुन आवर्तन सोडण्यात आले आहे.)

मांडओहोळ – ३१० दलघफु

रब्बी हंगामात १ आवर्तन सोडण्यात आली. त्यात १०७ दलघफु पाणी वापर झाला. सद्यस्थितीत दि.१७ फेब्रुवारी २०२६ पासुन आवर्तन सोडण्यात आले आहे)

घाटशिळ पारगांव – २९७ दलघफु

(रब्बी हंगामात १ आवर्तन सोडण्यात आली. त्यात ८१ दलघफु पाणीवापर झाला. सद्यस्थितीत दि.११ फेब्रुवारी २०२६ पासुन आवर्तन सोडण्यात आले आहे.)

सरकारचा डिजिटल स्ट्राईक; अश्लील कंटेंट दाखवणारे ‘या’ 5 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी-

ल.पा.प्रकल्प व को.प.बंधारे– ३७२९ दलघफु

(रब्बी हंगामात सांगवी व पाडोशी ल.पा.प्रकल्पातुन लाभधारकांच्या मागणीनुसार आवर्तने सोडण्यात आली. त्यात ४५ दलघफु पाणीवापर झाला. सद्यस्थितीत लोहारे, कासारे, घोटी शिळवंडी, बलठण, शिरपुंजे या ल.पा.प्रकल्पातुन आवर्तन सोडण्यात आले आहे.)

Exit mobile version