Sanjay Raut Controversial Statement On Flying Kiss : लोकसभेतील राहुल गांधींच्या फ्लाइंग किसचे समर्थन केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आम्ही महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या बायकांचे फ्लाइंग किस पाहिल्याचे विधान राऊतांनी केले आहे. त्यांच्या या विधानाने राज्यात नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Ved Movie : रितेश-जिनीलियाच्या वेडचा नवा विक्रम; अनोख्या रेकॉर्डची गिनीज बुकमध्ये नोंद
फ्लाइंग किस काय असते? असा प्रश्न विचारत राऊत म्हणाले की, फ्लाइंग किस म्हणजे आपले प्रेम व्यक्त करण्याचे नवीन पिढीचे ते एक साधन असल्याचे राऊतांनी यावेळी सांगितले. राहुल गांधी यांनी फ्लाइंग किस दिले म्हणजे कोणाचा विनयभंग केला आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी अत्यंत प्रेमाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, पंतप्रधान मोदींनीदेखील फ्लाइंग किस द्यावा त्यांना कोणी अडवलं आहे असा सल्लाही राऊतांनी यावेळी दिला.
मणिपूरवर केवळ अडीच मिनिटांचे भाष्य
यावेळी राऊतांनी मोदींनी काल (दि. 10) लोकसभेत मणिपूर मुद्द्यावर केवळ अडीच मिनिटे भाष्य केल्याचा घणाघात केला. मोदीं काल विक्रमी वेळेचे भाषण केले आणि त्यात केवळ अडीच मिनिट मणिपूरवर बोलले, आपण राजकारण करत आहेत, मोदींचे भाषण काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर होते. महागाई, चीनचा धोका यावर एक चकार शब्ददेखील काढला नाही.
PM मोदींचे 2 तास 12 मिनिटे भाषण, 98 वेळा टाळ्या, 22 वेळा हशा
मणिपूरच्या समस्येला नेहरू जबाबदार आहेत, आता नेहरूंच्या प्रेमातून बाहेर पडा, दहा वर्ष आपले सरकार आहे, आपण काय केल? मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी होते आपण काय केले तेव्हा? पण जसे संताजी धनाजी दिसायचे तसे यांना नेहरू दिसतात. नेहरू हे फार मोठे नेते, त्यांना जगाची मान्यता आहे, तुम्ही सत्ता सोडा, तुम्ही कोणत्या राज्याचा प्रश्न सोडवला? आमच्या बेळगावचा प्रश्न तरी सोडवा, शांतीचा सूर्य कधी उगवेल? तुमचा सूर्य मावळणार आहे, 2024 ला ते बघा, सत्ताधारी पक्षातर्फे संसदेत मनमानी झाली, देशाने पाहिली आहे.
मुंबईतील बैठकीत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढणार
यावेळी राऊतांनी मुंबईत होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीवरदेखील भाष्य केले. ते म्हणाले की, विरोधकांची पहिली बैठक पाटणानंतर बंगळुरू आणि आता ज्या ठिकाणी आमचे शासन नाही, त्या मुंबईत होणार आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी ही बैठक मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणार असून, बंगळुरू येथे 26 पक्ष आले होते. मात्र, मुंबईत त्यापेक्षा जास्त येतील.
मंत्रिपदावरून मारामाऱ्या होण्याची भिती
काल (दि. 10) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या आमदारांसाठी जेवणाचे आयोजन केले होते. पण नंतर ते रद्द झाले. कारण, या कार्यक्रमात मंत्रीपदावरून मारामाऱ्या होतील अशी त्यांना भीती होती. एकनाथ शिंदे काल हेलिकॉप्टरने गावी निघाले होते. पण ते देखील उडू शकले नाही. त्यांच्या बाजूने जनता आणि निसर्ग देखील नाही, हे सर्व औट घटकाचे सरकार आहे.
तपास यंत्रणांना गर्भित इशारा
2024 ला महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडियाचे सरकार येईल. तेव्हा तुम्ही कुठे जाल? माझ्या महाराष्ट्रातील पोलिसांना आणि तपास यंत्रणेला देखील सवाल आहे. 2024 ला या सर्व खोट्या तपासण्या चौकशा केसेस या बद्दल तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल, कोणालाही दया, माया केली जाणार नाही.