Download App

श्रीगोंद्याच्या जागेसाठी आघाडीत रस्सीखेच…जगताप की पाचपुते कोणाला मिळणार संधी?

Rahul Jagtap : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे मात्र त्यापूर्वीच काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावे समोर

  • Written By: Last Updated:

Rahul Jagtap : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे मात्र त्यापूर्वीच काही राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावे समोर येऊ लागली आहे. यात नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघाबाबत (Srigonda Constituency) एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. श्रीगोंदा कुकडी सहकारी साखर कारखाना चेअरमन माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे तसेच विधानसभेच्या तयारीला लागा असे शरद पवारांनी आदेश दिल्याचे देखील जगताप यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.

दरम्यान राहुल जगताप व शरद पवार यांच्या भेटीचा फोटो देखील व्हायरल होतो आहे. त्यामुळे श्रीगोंदेची जागा महाविकास आघाडीमध्ये (MVA) राष्ट्रवादीला मिळणार अशी चर्चा रंगते आहे मात्र या जागेसाठी ठाकरे गट देखील आग्रही असून खासदार संजय राऊत यांनी साजन पाचपुते यांच्या नावाची देखील घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. दरम्यान आघाडीमध्ये ही जागा कोणाला सुटणार व कोण उमेदवार असणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल मात्र उमेदवारीवरून आघाडीत बिघाडी होणार का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्यांमध्ये विधानसभेचे निवडणुकीचे बिगुल वाजणारअसून निवडणुकीच्या अनुषंगाने आता राजकीय वातावरण देखील तापू लागले आहे. यातच नगर जिल्ह्यात देखील अटीतटीच्या फाइट्स पाहायला मिळतील. श्रीगोंद्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांचे चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते तसेच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अनुराधा नागवडे हे विधानसभेच्या तयारीत आहे तर महाविकास आघाडीकडे राष्ट्रवादीकडे असलेल्या या जागेवरती शरद पवार गटाकडून राहुल जगताप हे विधानसभेच्या तयारीत आहेत.

दरम्यान माजी आमदार राहुल जगताप यांनी आज मोठे शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्व्हा शरद पवार यांची भेट घेतली तसेच जगताप यांनी विधानसभेच्या अनुषंगाने कामाला लागावे असे आदेश शरद पवार यांनी दिल्या असल्याचे देखील राष्ट्रवादीचे राहुल जगताप यांचे कार्यकर्ते सांगत आहेत.

आघाडीत बिघाडी?

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून अनेक इच्छुक उमेदवारांची नावे समोर आली होती. यामध्ये ठाकरे गटाकडून साजन पाचपुते तर काँग्रेस कडून घनश्याम शेलार तसेच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून राहुल जगताप हे विधानसभेच्या तयारीत आहेत.

माझ्या भाषणाची स्टाईल बदलवणारा मास्टर माईंड ‘नाना’; फडवीसांनी खुल्यामनानं सांगितलं…

मात्र काही दिवसांपूर्वी श्रीगोंदा येथे झालेल्या एका कार्यक्रमांमध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी साजन पाचपुते हेच श्रीगोंद्याचे उमेदवार असतील अशी जाहीर घोषणा देखील केली होती मात्र आता त्यानंतर राहुल जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेत आपल्या नावाची चर्चा असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी बिघाडी असल्याचे देखील समोर येते.

follow us