‘…तर माझ्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय खुला’; नाना काटे बंडखोरीच्या तयारीत?

  • Written By: Published:
‘…तर माझ्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय खुला’; नाना काटे बंडखोरीच्या तयारीत?

Nana Kate : चिंचवड विधानसभेकडे सध्या सगळ्यांचेच लक्ष लागलंय. चिंचवडमध्ये(Chinchwad) सध्या भाजपच्या (BJP) अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या आमदार आहेत. त्यामुळे ही जागा महायुतीत (Mahayuti) भाजपच्या वाट्याला जाणार अशी चर्चा आहे. तर याच जागेसाठी अजितदादा गटही आग्रही आहे. अजित पवारांचे खंदे समर्थक नाना काटेंची (Nana Kate) चिंचवड विधानसभा (Chinchwad Assembly) लढण्याची इच्छा आहे. मात्र, जर ही जागा राष्ट्रवादीला (NCP) सुटता, भाजपला सुटली तर माझ्यासाठी महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पर्याय खुला आहे, असं विधान काटे यांनी केलं.

Kamal Haasan: कमल हसनच्या ‘ठग लाइफ’ने रिलीजपूर्वीच कमावले 100 कोटी! 

नाना काटे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीत अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चिंचवडच्या जागेची मागणी करणार आहेत. माझं अजित पवारांशी बोलणं झालेलं आहे, तू तुम्ही पद्धतीने नागरिकांशी संवाद साध, तयार कर, अशा सूचना मला दादांनी दिल्याचं काटे म्हणाले.

पुढं बोलतांना ते काटे म्हणाले की, ही जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा शिवसेना शिंदे गटाला न मिळता भाजपला मिळाली तरी मी निवडणूक लढवणार आहे. याबाबत मी दादांशी बोलेन, भापजला ही जागा मिळाली तर इतर पक्षांचे देखील माझ्याकडे पर्याय आहेत. माझ्यासाठी महाविकास आघाडीचा पर्याय खुला आहे, असं म्हणत नाना काटेंनी बंडखोरी करणार हे स्पष्ट केलं आहे.

लहान अन् मोठा भाऊ नाही तर..,; नाना पटोलेंनी मविआच्या जागावाटपाचा फॉर्मुला सांगितला 

काटे यांच्या शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू असल्याच्या देखील चर्चा आहेत. याविषयी विचारलं असता ते म्हणाले, त्या-त्या वेळी मी माझा निर्णय जाहीर करेन. त्यामुळं जागावाटपात चिंचवडची जागा भाजपला सुटली तर नाना काटे शिवसेना ठाकरे गटाची मशाल हाती घेणार की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तुतारी फुंकणार हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

नाना काटे हे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा आहेत. याविषयी विचारलं असता ते म्हणाले, मी निवडणूक लढवणारच आहे. पण, ही जागा कोणत्या पक्षाला सुटते यावरही अवलंबून आहे. त्यामुळं मी त्या-त्या वेळी माझा निर्णय जाहीर करेन, असे ते म्हणाले.

दरम्यान, जागावाटपात चिंचवडची जागा भाजपच्या वाट्याला गेल्यास काटे ठाकरे गटाची मशाल हाती घेणार की शरद पवार गटाची तुतारी फुंकणार हेच पाहणं महत्वाचं ठरत आहेत.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube