Download App

Rahul Kanal : दिशा सॅलियन प्रकरणाची फाईल पुन्हा… पक्षप्रवेश करताच राहुल कनालांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

Rahul Kanal Enter in Shivsena : ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची गळती थांबल्याचे नाव घेत नाही. शिवसेनेत दोन गट पडल्यापासून अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अजूनही शिंदे गटात ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी शिंदे ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताच त्यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. (Rahul Kanal criticize Aditya Thackeray on Disha Salian matter while Enter in Shivsena )

Shirdi Saibaba : शिर्डीकरांच्या विरोधाला यश; साईबाबा समाधी मंदिराची सुरक्षेसाठी सीआयएफ नियुक्तीचा निर्णय मागे

पक्षप्रवेश करताच कनालांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल :

शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताच त्यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. कनाल म्हणाले की, दिशा सॅलियन प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करून सखोल चौकशी करा. अशी मागणी राहुल कनाल यांनी केली आहे. राहुल कनाल मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी कनाल बोलत होते.

Samruddhi Accident : मृतांची ओळख पटवण्यात अडचणी, सामूहिक अत्यंसंस्कार करण्याचा निर्णय

दरम्यान राहुल कानाल यांच्यावर शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यावरून ठाकरे गटाकडून आरोप करण्यात येत होता की, दिशा सॅलियन प्रकरणाची चौकशी टाळण्यासाठी त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यावर कनाल यांनी पलटवार करत दिशा सॅलियन प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करून सखोल चौकशी करा. असं म्हणत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करताच त्यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. तर मी या सखोल चौकशीसाठी जेथे बोलवाल तेथे यायला तयार आहे असं देखील यावेळी कनाल म्हणाले.

तसेच यावेळी त्यांनी बात घमंड की नही बात इज्जत की है, लोगोने अपने लहजे बदल दिये हमने अपने रास्ते बदल दिये. असं म्हणत त्यांनी ठाकरे गटामध्ये आपल्यावर अन्याय होत असल्याचं पुन्हा बोलून दाखवलं.

Tags

follow us