Rahul Narwekar Political Journey : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आमदार अपात्रतेवरील निकाल काल (दि. 10) अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला आहे. या निकालात त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच शिवसेना खरी असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. यासाठी त्यांनी कायद्यातील 10 व्या परिशिष्टाचा संदर्भ दिला. मात्र, या सर्वामध्ये प्रश्न उपस्थित राहतो. तो म्हणजे शिंदेंच पक्षांतर न म्हणणाऱ्या नार्वेकरांनीच यापूर्वी दोनवेळा मोठ्या राजकीय पक्षांना रामराम केला आहे. त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिला आहे हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
पक्षाची घटना ते बहुमताचा आकडा; एकनाथ शिंदे अपात्रतेतून कसे तरले ?
पेशाने वकील
राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर ते या पदावर बसणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्याकडे एक उच्चशिक्षित अध्यक्ष म्हणून आता पाहिले जात आहे. बीकॉम व त्यानंतर एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसायाने वकील असलेले राहुल नार्वेकर कालांतराने राजकारणात आले. त्यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांसाठी वकील म्हणून बाजू मांडण्याचं काम केलं. सध्या जरी नार्वेकर भाजपमध्ये असले तरी त्यांची राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसैनिक म्हणून झाली होती. एकेकाळी ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील होते. त्याचबरोबर आदित्य ठाकरेंच्या जवळचे म्हणून देखील त्यांना ओळखलं जायचं. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने त्यांना तिकीट नाकारलं आणि त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
कोण एकनाथ शिंदे, त्यांची लायकी काय? संजय राऊत भडकले…
ऐन निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर म्हणजेच 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी NCP कडून मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. परंतु, येथ त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना 2014 साली विधान परिषदेवर आमदर म्हणून पाठवलं. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या अगदी तोंडावर नार्वेकर राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.
MLA Disqualification Case : शिंदेंचे बंड ते अपात्रतेची धाकधूक; 569 दिवसातील प्रत्येक घडामोड
एवढेच नव्हे तर, त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणूकीत भाजपच्या तिकीटावर मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि भाई जगताप यांचा पराभव करत निवडूनही आले. शिवाय भाजपकडून त्यांना मीडिया इंचार्ज पदाची जबाबदारीही देण्यात आली होती. तेव्हापासून ते भाजपमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने स्थिरावले आहेत.
सासरे-सभापती तर जावई अध्यक्ष
आता हा झाला नार्वेकरांचा राजकीय प्रवास मात्र, याशिवाय त्यांच्या विषयी आणखी एक खासियत आहे आणि ती म्हणजे नार्वेकर हे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक – निंबाळकर यांचे जावई आहे. सुरूवातीलच्या काळामध्ये नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष असताना रामराजे नाईक – निंबाळकर हे विधान परिषदेचे सभापती होते.
Mukesh Ambani : होय, ‘रिलायन्स’ गुजरातीच; अंबानींनी सांगितला गुजरात विकासाचा रोडमॅप
निकालावर काय म्हणाले उद्धव ठाकरे
आमदार अपात्रेवर नार्वेकरांच्या निकालानंतर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली असून, उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्षाची घटना अवैध असेल तर, मग आमदार अपात्र कसे? असा सवाल उपस्थित केला आहे. नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे काम केले नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी केवळ वेळकाढूपणा केला असून, हा निकाल ते पहिल्या दिवशीही देऊ शकत होते. नार्वेकरांचा निकाल आम्हाला आणि जनतेला मान्य नसून आम्ही दाद मागण्यासाठी सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे ठाकरेंनी म्हटले आहे.