Download App

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 400 एकर परिसरात हाेणार साैर ऊर्जा प्रकल्प

  • Written By: Last Updated:

नगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 400 एकर परिसरात 100 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे विद्युत देयके कमी करण्यासाठी महानिर्मितीकडून स्वतंत्रपणे 500 किलाेवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पही विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पास 472.19 कोटी खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (rahuri-agricultural-university-solar-power-project)

राज्याची विजेची वाढती गरज लक्षात घेऊन राज्य सरकारकडून सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन) यांच्यात 5 हजार 220 मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिली. या माध्यमातून सुमारे 41 हजार कोटींची गुंतवणूक आणि 6 हजार 760 रोजगार निर्मिती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘एक दिल टुकडे हजार, कोई कहाँ गिरा’.. बावनकुळेंनी शायराना अंदाजात केलं महाविकासआघाडीचं भाकीत

ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन

मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे ऊर्जा मंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि एसजेवीएन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा आदी उपस्थित हाेते. ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यावर अधिक भर देण्यात येत आहे.

Tags

follow us