तनपुरे कन्फ्युज! पाठिंबाही नाही प्रवेशही नाही… नेमक घोडं अडलं कुठं?

Rahuri By Election Prajakt Tanpure हे राहुरीत मुख्यमंत्र्यांची सभेच्या दिवशी निर्णय घेणार होते. मात्र त्यांनी कोणताही निर्णयही घेतला नाही.

Prajakt Tanpure

Prajakt Tanpure

Rahuri By Election Prajakt Tanpure Confuse no support to Kardile also no entered in BJP : राहुरी पोट निवडणुकीतून माघार घेत चर्चेचा विषय ठरलेले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या. राहुरीत मुख्यमंत्र्यांची सभा पार पडणार त्याच दिवशी तनपुरे ही निर्णय घेणार होते. मात्र अक्षय कर्डिलेसाठी फडणवीसांची सभा पार पडली. तरीही तनपुरे यांनी कोणताही निर्णयही घेतला नाही. तसेच त्यांच्या भाजप प्रवेशा बाबतही कोणतेही पाऊल उचलले गेले नसल्याने तनपुरे हे कन्फ्युज झाल्याचे दिसते. निवडणुकीतून माघार घेतल्याने तनपुरे हे कर्डिले यांना पाठिंबा देणार की, याबाबत कार्यकर्तेही संभ्रमात असल्याने त्यांची ही मोठी गोची झाली.

मैत्रीचा वारसा जपण्यासाठी विनय येडेकर यांची नवी सुरुवात; ‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ मधून रसिकांच्या भेटीला!

खरंतर राहुरी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर प्राजक्त तनपुरे हे देखील निवडणूक लढवण्यावरती ठाम होते. तसा त्यांनी जोरदार प्रचारही सुरू केला व त्यांच्यासमोर उभे असलेले भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेले अक्षय कर्डिले हे नवखे असल्याने तनपुरे यांच्यासाठी आमदारकीची वाट ही सुखरूप होती. मात्र तनपुरे निवडणूक लढवणार की नाही याबाबत स्पष्टता येत नव्हती. तनपुरांचा बदलता पेहराव यामुळे ते राष्ट्रवादी कोण लढणार की, अपक्ष याबाबतही तर्कवितर्क लावले जात होते. कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपण निर्णय घेऊ असं तनपुरे सांगत होते. मात्र अर्ज दाखल करण्याच्या दिवशी वेगळेच घडले.

खाशाबा जाधवांना 74 वर्षांनी मरणोत्तर पद्मविभूषणाचा मार्ग मोकळा; न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

6 एप्रिल रोजी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तनपुरे यांची भेट घेत निवडणुकीतून आपण माघार घ्यावी अशी विनंती केली. त्यानंतर माध्यमानसमोर तनपुरे म्हणाले की, मतदारसंघातील प्रश्न सोडवले जाण्याचे आश्वासन आपल्याला मुख्यमंत्र्यांकडून तसेच भाजपच्या वरिष्ठांकडून देण्यात आल्याने आपण निवडणुकीतून माघार घेतो आहे व येणाऱ्या काळात कार्यकर्त्यांशी संवाद साधून आपला निर्णय जाहीर करू असं तनपुरे म्हणाले.

महाराष्ट्राची मोरनी गौतमी पाटील तिच्या नव्या लूक बद्दल काय म्हणाली….

त्यानंतर तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोरदार सुरू झाल्या. 20 एप्रिल रोजी राहुरी मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिलें यांच्यासाठी प्रचार सभा घेणार होते. त्याच दिवशी तनपुरे देखील निर्णय घेणार असल्याचा त्यांनी स्पष्ट केलं. यामुळे मुख्यमंत्र्यांचे उपस्थितीत तनपुरे यांचा पक्ष प्रवेश होणार याही चर्चा रंगू लागल्या. मात्र आपण अद्यापही राष्ट्रवादीतच आहोत. असं तनपुरे सांगत होते. यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाला कुठेतरी ब्रेक लागल्याचे देखील चर्चा रंगू लागल्या.

तनपुरेंची स्टंटबाजी त्यांच्याच अंगलट

निष्ठावंत कार्यकर्त्यांची पक्षात केवळ अवहेलना होती असं म्हणत तनपुरे यांनी एक प्रकारे राष्ट्रवादीवरती निशाणा साधत आपण वेगळ्या वाटेवर असल्याचे देखील सुचक विधान केले. यातच रवींद्र चव्हाण देखील म्हणाले की, तनपुरे भाजपात आले तर त्यांचे स्वागतच करू मात्र मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दिवशी असे काही एक घडले नाही. उलट फडणवीस यांनी आपल्या उमेदवाराची पाठ थोपटावत एक प्रकारे तानपुरे यांना चेकमेट केलं.

फडणवीस सुदर्शन फिरवणार राम शिंदे यांचे सूचक वक्तव्य

विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या दिवशी प्राजक्त तनपुरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. प्रदीर्घकाळ चर्चा केली व त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, फडणवीस हे सुदर्शन चक्र फिरविणार व काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. असं सूचक विधान शिंदे यांनी केले. मात्र फडणसांची सभा पार पडली कोणताही निर्णय याबाबत झाला नाही. त्यामुळे शिंदे यांचे वक्तव्य देखील निरर्थक ठरल्याचं बोललं जातं.

तनपुरेंच्या माघारीची हेही कारणे

केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आहे व विरोधी पक्षात काम होत नाही. असं तनपुरे यांनी वेळोवेळी बोलून दाखवले. यामुळे त्यांची पावले ही सत्तेच्या दिशेने असल्याचे देखील अधोरेखित होत होते. अक्षय कर्डिले यांच्यासाठी तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतली. मात्र त्यांचं विधान परिषदेवर पुनर्वसन केलं जाईल. अशा चर्चा सुरू होत्या. तसेच तनपुरे यांची सुरू असलेली ईडी चौकशी यादेखील थांबल्या जातील. असे देखील बोलले जात होते. मात्र 20 एप्रिल रोजी निर्णयाच्या तयारीत असलेले तनपुरे यांनी अद्यापही आपला निर्णय जाहीर केला नसल्याने मागण्या फिस्कटल्याने तनपुरे हे निर्णय घेत नसल्याचे देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

निर्णय नाही स्टंटबाजी व केवळ चर्चा

कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन आपण निर्णय घेणार असल्याचं तनपुरे वारंवार सांगताहेत. त्या अनुषंगाने कार्यकर्ते देखील तनपुरे यांची भेट घेत काय केलं पाहिजे यावरती चर्चा करतायेत. मात्र दहा-बारा दिवस होऊनही तनपुरे यांनी कोणताही निर्णय हा घेतला नाही. उघड-उघड अक्षय कर्डिले यांना पाठिंबाही नाही किंवा आपण पक्षात असल्याचं बोलत असतं. तनपुरे त्यांच्याच पक्षातील उमेदवारांच्या प्रचारात किंवा सभांमध्येही दिसत नाही. यामुळे तनपुरेंची दुटप्पी भूमिका ही त्यांच्यासाठीच अडचणीची ठरते.

 

Exit mobile version