Rain Alert : दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने थैमान (Cyclone Michaung) घातले असून मुसळधार पाऊस पडला. या पावसात (Rain Alert) मोठे नुकसान झाले. अनेक जण मृत्यूमुखी पडले. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला आहे. काही ठिकाणी पाऊस झाला तसेच सर्वत्र ढगाळ हवामान होते. अशातच आता हवामान विभागाने (Weather Update) पुन्हा काही राज्यांत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. पुढील 48 तासांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस देशातील काही राज्यांत अवकाळी पाऊस होईल. महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, लक्षद्वीप या राज्यात विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Rain Alert : आजही अवकाळीचं संकट! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यात आज आणि उद्या पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात राज्यातील काही भागात पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात अन्य ठिकाणी ढगाळ हवामान राहिल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
मिचाँग चक्रीवादळाचा परिणाम राज्यात जाणवत आहे. काल राज्यात दिवसभरात ढगाळ हवामान होते. आज आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या काळात जोरदार पाऊस होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या चक्रीवादळाचा इफेक्ट राज्यात आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचेच यावरून स्पष्ट होत आहे.
राज्यात या वादळाचा परिणाम दिसून येत आहे. अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आहे. थंडीचा कडाका कमी झाला आहे. आज पुणे आणि आसपासच्या परिसरात हवामान ढगाळ राहिल. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर अन्य ठिकाणी हवामान सामान्य राहिल असा अंदाज आहे.