Rain Alert : नागरिकांनो घरातून निघताना जरा, सांभाळून कारण…हवामान विभागाने इशारा दिलायं

राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलायं.

Ahilyanagar Rain Update

Ahilyanagar Rain Update

Rain Alert : मागील काही दिवसांपूर्वी राज्यात परतीच्या पावसाने (Rain Alert) धुमाकूळ घातल्याचं चित्र पाहायला मिळालं. परतीच्या पावसाचा जोर इतका होता की राज्यात सर्वदूर शेतकऱ्यांची पिकेच नाही तर जमीनीच वाहून गेल्याचं दिसून आलं. या सदम्यातून शेतकरी अद्याप बाहेर पडलेला नसतानाच आता हवामान विभागाकडून पुन्हा विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य, महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात आज जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलायं. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांना घरातून बाहेर पडताना काळजी घेण्याच आवाहन करण्यात आलंय.

आरएसएस शताब्दी कार्यक्रमात भाग घेणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, मुख्यमंत्र्यांना पत्र

अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटाजवळ समुद्र सपाटीपासून ५.८ उंचीवरुन वारे वाहत असल्याने कर्नाटक, केरळ किनाऱ्याजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचाच परिणाम म्हणून पुढील 24 तासात राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज आहे.

Virat Kohli : ‘तुम्ही फक्त तेव्हाच अपयशी ठरता जेव्हा…’, निवृत्ती घोषणा? कोहलीच्या पोस्टमुळे क्रिकेट विश्वात खळबळ

तसेच मराठवाड्यातील काही भागात, छत्रपती संभाजीनगर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, जालना, सांगली या भागात पाऊस झाला. काल सायंकाली ठाणे जिल्हात अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचेही बघायला मिळाले. यावेळी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट देखील सुरू होता. भारतीय हवामान विभागाने 72 तासांसाठी पावसाचा अलर्ट दिला आहे. पश्चिम बंगालच्या खाडीमध्येही कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे संकेत आहेत.

लेट्सअपच्या दिवाळी अंकाचे CM फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन; ‘लक्षवेधी महाराष्ट्रीय’मुळे अंक वेगळ्या उंचीवर

काही दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारकडून या शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी स्पेशल पॅकेज देखील जारी करण्यात आला आहे. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

दु:खद बातमी! महाभारत मालिकेत कर्णची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन

दरम्यान, हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या पश्चिम – मध्य अरब समुद्रात सपाटीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागरात देखील दक्षिण बांगलादेश आणि आसपासच्या प्रदेशात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने राज्यात पावसाची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आल्याने नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version