Download App

Rain Alert : पावसाचं संकट! नववर्षालाच पाऊस लावणार हजेरी; हवामानाचा अंदाज काय?

Rain Alert : वर्ष संपण्यास पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. याच दिवसांत हवामानात बदल होऊन (Rain Alert) थंडीत वाढ झाली आहे. थंडीचा कडाका वाढत असतानाच काही ठिकाणी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शक्यतो या दिवसांत पाऊस होत नाही. परंतु, सध्या हवामानाचे चक्रच बिघडले आहे. त्यामुळे अवेळी पाऊस, प्रमाणापेक्षा जास्त थंडी असे प्रकार घडत आहेत. आता 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान राज्यातील काही भागांत पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD Rain Alert) व्यक्त केला आहे.

जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब या राज्यांत पाऊस होईल. राज्यातील शिरपूर, शहादा, चोपडा, यावल, रावेर तालुक्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होईल. 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान येथे पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुणे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये 27 ते 31 डिसेंबर दरम्यान सकाळच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच हरियाणाचा काही भाग, चंदीगड, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातही दाट धुके पडण्याचा अंदाज आहे. या काळात महाराष्ट्रात जर पाऊस झाला तर याचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसण्याची शक्यता आहे. यंदा प्रमाणापेक्षा कमी पाऊस झाला आहे. तसेच अवेळी पावसाचे प्रमाणही राहिले आहे. यामुळे पिकांना फटका बसून उत्पादनात घट झाली आहे.

Rain Alert : सावधान! ऐन थंडीत मुसळ’धार’ 48 तासांत ‘या’ जिल्ह्यांना झोडपणार

 

Tags

follow us