Rain Alert : सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा फटका (Rain Alert) राज्याला बसत आहे. राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत चालला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. आज राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) व्यक्त केला आहे. शनिवारी राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार अनेक जिल्ह्यांत पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, नाशिक, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत मुसळधार पावसासह गारपीट होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
Rain Alert : पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीचं संकट; हवामान विभागाने अंदाज सांगितला
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत आज पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात बदल झाला. गारठा आणखीनच वाढला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे कांदा रोपांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मात्र अन्य रब्बी पिकांना फायदा होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. काल रात्री बराच वेळ पाऊस सुरू होता. कुडाळ, सावंतवाडी, कणकवली तालुक्यात पावसाने हजेरी लावली.
राज्यात आजपासून 25 नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव या जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून हवामान खात्याने या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी केला आहे.
Rain Alert : अवकाळीचं संकट! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामानाचा अंदाज काय ?
दरम्यान, 5 ऑक्टोरनंतर राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. ढगाळ वातावरण काही दिवस कायम होते. पण, पाऊस पडला नाही. ऑक्टोबर महिन्यात सर्वत्रच कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कोकणातील काही भागांना ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानंतर आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात तर पावसाला सुरुवातही झाली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जर अन्य जिल्ह्यात पाऊस झाला तर या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.