Rain Alert : अवकाळीचं संकट! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामानाचा अंदाज काय ?

Rain Alert : अवकाळीचं संकट! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामानाचा अंदाज काय ?

Rain Alert : सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा फटका (Rain Alert) राज्याला बसत आहे. राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत चालला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे. आजपासून राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील चार ते पाच दिवस पाऊस राहिल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. 25 आणि 26 नोव्हेंबर या दिवशी मुंबई आणि रत्नागिरीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात काही भागात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. असे जर झाले तर शेतकऱ्यांच्या अडचणी मात्र वाढतील. त्यामुळे या काळात शेतकऱ्यांना पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Rain Alert : अवकाळी संकट कायम, 4 दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळ’धार’

मुंबईप्रमाणेच राज्याच्या अन्य भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. उत्तर महारष्ट्रात तुरळक ठिकाणी गारा पडण्याची देखील शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी उद्यापासून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल. 24 ते 26 नोव्हेंबरपर्यंत यलो अलर्ट असेल. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल. या बदलत्या हवामानाचा पिकांवर निश्चितच परिणाम होईल. उद्या 24 नोव्हेंबर रोजी अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामान असेल.

दरम्यान, याच महिन्याच्या सुरुवातीला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. काही जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली. या दिवसांत पाऊस होत नाही. पिके काढणीची कामे वेगात सुरू असतात नेमक्या त्याचवेळी अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले होते. आताही हवामान विभागाने आणखी मराठवाड्यात अवकाळीचं संकट कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे. पुढील चार दिवसांत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : आज राज्यात तापमान घटणार; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

मराठवाड्याला बसणार फटका

24 नोव्हेंबर रोजी मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक तसेच 25 आणि 27 नोव्हेंबर रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस  होईल. शेतकऱ्यांनी फळबाग, भाजीपाला, फूल पिकांची काळजी घ्यावी. काढणीला आलेली पिके काढून घ्यावीत. तसेच आपल्याकडील पशुधनाचीही या दिवसात काळजी घ्यावी. या दिवसात पाऊस झाला तर पिकांसाठी अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube