IMD Alert : पुढील दोन सावधानतेचे, राज्यात पाऊस अन् थंडीची लाट, अलर्ट जारी

IMD Alert  : गेल्या काही दिवसांपासून राज्यात झपाट्याने वातावरण बदल असून याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला

IMD Alert

IMD Alert

IMD Alert  : गेल्या काही दिवसांपासून राज्यात झपाट्याने वातावरण बदल असून याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले तर आता राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे. यातच भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यात थंडीची लाट असणार असणार असल्याची माहिती दिली आहे.

तर दुसरीकडे राज्यात थंडीची (IMD Alert) लाट असताना पुढील दोन अनेक भागात पावसाची देखील शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात  1.5 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम असल्याने राज्यात पुढील काही दिवसांमध्ये थंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव, निफाड, नाशिक, परभणी आणि अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) थंडी अधिक वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

तर दुसरीकडे चंदीगड, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगडमध्ये देखील थंडीची लाट असणार असं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेता गोविंदा अचानक बेशुद्ध; रुग्णालयात दाखल, नेमकं घडलं काय ?

तर 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी राज्यातील काही भागांत थंडीची लाट येण्याची शक्यता असून किमान तापमानाच्या पाऱ्यात 4 ते 5 अंशांची घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुढील काही दिवस थंडी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Exit mobile version