Download App

राज्यभर पावसाचा कहर! शेतकऱ्यांसह चाकरमान्यांचे हाल; कुठे-काय घडलं?

Rain ने थैमान घातलं होतं. त्यानंतर आता राज्यात मान्सून देखील दाखल झालं आहे. यंदा तब्बल 10 दिवस अगोदर मान्सूनचं आगमन झालं आहे.

Rain wreaks havoc across the state! The plight of farmers and servants; Where and what happened : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा कहर सुरू (Monsoon Update) असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होत आहे. एकीकडे शेतकरी हवालदार झाला (Heavy Rain Alert) आहे, तर दुसऱ्या बाजूला मुंबईत आज सकाळपासून चाकरमान्यांचे हाल होतांना दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं होतं. त्यानंतर आता राज्यात मान्सून देखील दाखल झालं आहे. यंदा तब्बल 10 दिवस अगोदर मान्सूनचं आगमन झालं आहे.

प्रतिबिंब प्रतिष्ठानचे लोकार्पण व महाराष्ट्र महागौरव पुरस्काराचे वितरण, लेट्सअपचे विष्णू सानप यांचाही सन्मान

आज राज्यातील बारामती, पुणे, हिंगोली, अहिल्यानगर, नाशिक यासह इतर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. यामध्ये पुणे सोलापूर महामार्गावर स्वामी चिंचोली या ठिकाणी पावसाच्या प्रचंड पाण्यामुळे एक इनोव्हा कार वाहून गेली. सुदैवाने यामध्ये कोणतेही जीवित हानी झालेली नाही. तर हिंगोलीमध्ये जावळा पळशी ते नरसी या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असलेल्या पुलाचे काम सुरू आहे. यासाठी अनेकदा पर्यायी मार्ग वापरले जातात. पण हे मार्ग देखील पावसामध्ये वाहून गेले आहेत.

मन सुन्न करणारी घटना; एका महिलेची तीच्या दोन मुलांसह निर्घुण हत्या, पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न

तर पुण्याच्या इंदापूरमध्ये बस स्थानकाचा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने प्रवाशांसह चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तर अहिल्यानगर शहरामध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दुसरीकडे शहरांमध्ये रस्त्यांचे बांधकाम चालू असल्याने पर्यायी मार्गांवर देखील वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.तर या पावसामुळे बारामतीमध्ये असलेला निरा डावा कालवा फुटल्याने हजारो लिटर पाणी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी मार्गावर आले आहे. यामुळे ही वाहतूक बंद पडली आहे.

दहा दिवस आधीच मान्सूनची महाराष्ट्रात वर्दी…

केरळनंतर नैऋत्य मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात पोहोचला आहे. प्रादेशिक हवामान केंद्रातील शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार आज 25 मे रोजी मान्सून हा तळकोकणातील देवगडपर्यंत दाखल झालेला आहे. महाराष्ट्र-गोव्यामध्ये दाखल होण्याची सर्वसाधारण जी सरासरी तारीख (Rain Alert) आहे, ती 5 जून आहे. याच्या दहा दिवस आधीच मान्सून दाखल झालेला आहे. पुढच्या तीन दिवसांमध्ये हवामान (Weather Update) अनुकूल आहे. त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या विभागांमध्ये मुंबईत दाखल होण्याची शक्यता होती.

दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार: चर्चा अंतिम टप्प्यात; वाचा, काय म्हणाल्या सुनेत्रा पवार

2009 नंतर पहिल्यांदाच मान्सून महाराष्ट्रामध्ये इतक्या (Maharashtra Rain) लवकर दाखल झालाय. केरळमध्ये 2011 साली 29 मे रोजी तर महाराष्ट्रात 4 जून,2012 साली केरळमध्ये 05 जून तर महाराष्ट्रात सहा जून रोजी मान्सून महाराष्ट्रात धडकला होता. हवामान विभागाने समुद्रकिनारी धोक्याचा इशारा दिला आहे.

follow us