Download App

“वेळ आलीय एकत्र येण्याची, शिवसैनिक तयार आहे”, ठाकरे गटाची राज ठाकरेंना सोशल साद

ठाकरे गटाने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. "वेळ आलीय, एकत्र येण्याची" अशा सूचक शब्दांत ठाकरे गटाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

Uddhav Thackeray Raj Thackeray News : राज ठाकरे यांचा मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना (उबाठा) एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. फक्त चर्चाच नाही तर या संभाव्य युतीच्या दिशेने पावलेही पडू लागली आहे. चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी बंधू उद्धव ठाकरेंना साद घातली होतीच. त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हिताचं कारण देत टाळी देण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर आता ठाकरे गटाने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. “वेळ आलीय, एकत्र येण्याची” अशा सूचक शब्दांत ठाकरे गटाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

ठाकरे गटाने इन्स्टाग्रामवर केलेली ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टद्वारे मनसे प्रमुख राज ठाकरेंना साद घातल्याची चर्चा सुरू आहे. “वेळ आलीय, एकत्र येण्याची. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!” असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे.  प्रत्येक मराठी माणूस या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय. एकदा घोषणा झाली की मग वादळ आणि फक्त वादळ अशा कमेंट्स या पोस्टवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत. यावर आता मनसे काय प्रतिक्रिया देणार याची उत्सुकता आहे.

काय म्हणाले होते राज ठाकरे ?

महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी भूमिका मांडली होती. वास्तव मे ट्रूथ या यू-ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच्या (Uddhav Thackeray) युतीबाबत भाष्य केले. आज शिवसेना फुटली पण जर फुटली नसती तर, अजुनही तुम्ही (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्र येऊ शकतात का? हे संपूर्ण महाराष्ट्राचं स्वप्न आहे असे मांजरेकर म्हणाले.

त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडण छोटी असून, महाराष्ट्र खूप मोठा असल्याचे उत्तर राज ठाकरेंनी दिले. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तिस्वासाठी ही भांडणं, वाद आणि अन्य सर्व गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही फार काही कठीण गोष्ट आहे असे मला वाटत नाही.

या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की.. पहलगाम हल्ल्यानंतर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया 

follow us