खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावरच बुमरॅंग होईल; दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरे आक्रमक

Udhhav Thackeray Agressive on BJP for Disha Salian Case : तब्बल अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian Death Case) आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहे. या प्रकरणावरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी देखील आरोप केले आहे. तर आता या प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी देखील आक्रमक होत सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे. यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावरच बुमरॅंग होईल.
मोठी बातमी! राणा दुग्गूबाती, प्रकाश राज यांच्यासह 25 सेलिब्रिटींवर एफआयआर दाखल; कारण काय?
यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मला गेल्या एक-दोन अधिवेशनापासून आश्चर्य वाटतच होतं की, हा मुद्दा आला कसा नाही? राज्यातील शेतकरी आत्महत्या आणि देशमुख हत्ये सारख्या प्रकरणाच्या तपासाचं काय? तसेच दिशा सालियन प्रकरण कोर्टात आहे. त्यामुळे तिच्या वकीलांनी त्यांच्याकडे जे पुरावे आहेत ते कोर्टात द्यावेत. तसेच यावेळी आदित्य ठाकरेंची पाठराखण करणाऱ्या शिंदेचे आमदार असलेल्या संजय गायकवाडांना उद्धव ठाकरेंनी धन्यवाद दिले.
दोन दिवसांत आणखी एक मोठा खुलासा करणार; दिशा सालियन प्रकरणी वकील ओझांचा इशारा
पुढे म्हटले की, आमच्या पिढ्यान् पिढ्या जनतेसमोर आहेत. त्यामुळे या विषयात काहीही तथ्य नाही. आमचा या प्रकरणाशी दूर दूर पर्यंत काहीही संपर्क नाही. पण यावर राजकारण वाईट बाजूला न्यायचं असेल तर सर्वांचीच पंचाईत होईल. काट्याचा नायटा करायचा असेल तर तो त्यांच्यावर देखील बुमरॅंग होऊ शकेल असं देखील यावेळी ठाकरे म्हणाले आहेत.
तर आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, गेल्या पाच वर्षात बदनामी करण्याचे प्रयत्न सुरु आहे. आम्ही न्यायालयात उत्तर देऊ . असं माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले.माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, 5 वर्षांपासून बदनामीतचा प्रयत्न केला जातोय अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच या प्रकरणात कोर्टात बोलावलं कोर्टात बोलू, होईल ते होईल असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले.