Raj Thackeray On Devendra Fadnavis : वरळी डोम येथे होत असलेल्या विजयी मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत जे बाळासाहेब यांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) जमले असा टोला लावला आहे.
या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 20 वर्षांनंतर मी उद्धव ऐका व्यापीठावर असून जे जे बाळासाहेब यांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं आहे. कोणत्याही वादापेक्षा भांडणा पेक्षा महाराष्ट्रा मोठा आहे. महाराष्ट्र आणि मराठीकडे वेड्या वाकड्या नजरेने पाहायचं नाही. सत्ता तुमच्याकडे असेल विधान भवनात पण आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर असं राज ठाकरे म्हणाले.
हिंदी असणाऱ्या राज्य सांभाळते आले नाही. हिंदी भाषे विषय मला वाईट वाटत नाही. एक भाषा उभी करायला प्रचंड ताकद लागते. अमित शहा यांना इंग्रजी येत नाही. हिंदी प्रांतात 125 वर्ष मराठ्यांनी राज्य केले पण आम्ही मराठी लादली का? हिंदी भाषा महाराजांच्या काळात देखील नव्हती. असं देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले.
आता यांनी नवा मुद्दा आणला आहे. ठाकरे मूल इंग्रजी मीडियममध्ये शिकत आहे असं सांगण्यात येत आहे पण फडणवीस इंग्रजीत शिकून फडणवीस मुख्यमंत्री झाले. आमच्याकडे देखील कोणाकोणाची मूल परदेशात आहे त्याची यादी आहे.मंत्र्यांचं हिंदी ऐका फेफर येईल असा टोला देखील राज ठाकरे यांनी या मेळाव्यात बोलताना लावला.
मनसे स्टाईल दणका, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं
तसेच पुढे काय काय होणार याची कल्पना नाही पण ही मराठीसाठीची एकजूट कायम राहावी अशी इच्छा देखील या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी व्यक्त केली.