Download App

राज ठाकरे भाजीवाला, ऑटोवाल्यांना अनुदान देत नाही; गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल

Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून (MNS) मराठी भाषेवरुन आंदोलन करण्यात येत आहे.

  • Written By: Last Updated:

Gunaratna Sadavarte On Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून मनसेकडून (MNS) मराठी भाषेवरुन आंदोलन करण्यात येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना बँक आणि इतर अस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो की नाही हे जाऊन तपासण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर मनसे कार्यकर्त्यांनी एका बॅंक कर्मचाऱ्याला मारहाण केली होती आणि याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल देखील झाला होता यानंतर या प्रकरणावरुन ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे भाजीवाला, टॅक्सीवाला आणि ऑटोवाल्यांना अनुदान देत नाही अशी टीका गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे.

यावेळी गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, राज ठाकरे भाषिक वाद निर्माण करू शकत नाही तसेच ते कोणीही व्यवसाय करताना भाषेची सक्ती करू शकत नाही. त्यांनी राईट टू स्पीच ॲंड एक्सप्रेशन समजून घ्यावं, राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर धुरळा उडवण्याचा प्रयत्न केला होता, गल्लीगल्लीमध्ये राज ठाकरेंच्या पक्षासारख्या पार्ट्या आहेत. असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

तसेच संविधानाला तडा जाऊ नये, राज ठाकरे यांनी अभ्यास करावा. केवळ राजकारण करण्यासाठी आपण हे करत आहात, मराठीच्या नावाखाली काय डील झाली हे सांगा? असं देखील गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

पुढे बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, राज ठाकरे भाजीवाला,टॅक्सी वाला आणि ऑटो वाल्याला अनुदान देत नाही. पत्रव्यवहाराची भाषा असू शकते. तालिबान सारख करू शकत नाही. प्रत्येक जण वेगळा बोलतो त्याच्या भाषेचा गोडवा समजून घ्या.असेही यावेळी गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाचा माज सरकार उतरवणार का? आदित्य ठाकरेंचा संतप्त सवाल

तसेच राज ठाकरे पेटवून देतात आणि नंतर घरातून निर्णय घेतात. त्यांच्या मुलाने बॅंकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली का? का नाही दिली परवानगी राज ठाकरेंनी? कारण माहिती आहे जेलमध्ये जावं लागतं. अशी टीका माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी केली.

follow us