मुंबई : अजितदादा आणि शरद पवारांच्या भेटीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांच्या शैलीत उत्तर देत एकाचवेळी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांना चिमटे काढले आहेत. ते म्हणाले की, आपण याआधीच सांगितले होते की, ही सर्व खेळी राष्ट्रवाचीचं असून, एक टीम आधी पाठवली आहे तर, आता दुसरी टीम जाईल असे म्हणत हे सर्वजण आज नव्हे तर, 2014 पासून मिळालेले आहेत. ते मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
राऊतांनी पवारांशी पंगा घेतलाच; तुम्ही नातीगोती जपायची अन् कार्यकर्त्यांनी डोकी फोडायची का?
राज ठाकरे म्हणाले की, मध्यंतरी झालेला पहाटेचा शपथविधी आणि त्यानंतर झालेल्या सर्व गोष्टी आपल्याला आठवत नाहीत का? असा सवालही यावेळी राज यांनी उपस्थित केला. पवार साहेबांना आणि अजितदादांना भेटण्यासाठी चोरडिया या ठिकाणी मिळाली आणि त्या नावावरती मिळाली ही कमालीची बाब आहे. ही टीका करताना राज यांनी ‘चोरडिया’ यातील पहिल्या शब्दांवर अधिक जोर दिला. त्यामुळे अनेक अर्थ काढले जात आहेत.
आजची बैठक लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणूकांसंदर्भात झाली. महाराष्ट्रामधील राजकीय घोळ झालेला आहे त्यानुसार मला वाटत नाही यावर्षी महापालिकेच्या निवडणूका लावल्या जातील. आता लागल्या तरी निवडणूका या आता लोकसभेच्याच लागतील असे राज ठाकरे म्हणाले. त्यादृष्टीने प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी होईल असे यावेळी राज ठाकरेंनी स्पष्ट केले. मुंबई गोवा महामार्गाबाबत मी पनवेलच्या मेळाव्यात बोलेन असे म्हणत आपल्या राज्याची प्रतारणा होणार नाही याची काळजी आमच्या पक्षाकडून घेतली जाईल असे ते म्हणाले.
अजित पवारांच्या बंडखोरीवर राज ठाकरेंनी केले होते ट्वीट?
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राज ठाकरेंनी एक सूचक ट्वीट केलं होतं. यात त्यांनी सरकारमध्ये सामील झालेली राष्ट्रवादीची पहिली टीम असून दुसरी टीम यथावकाश सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच, असं नमूद केलं होतं. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी या गोष्टीचा पुनुरूतच्चार केला.
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 2, 2023
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला . उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ? असे ट्विट राज ठाकरेंनी केले होते.
धमाकेदार ओपनिंगनंतर ‘गदर 2’ YouTube वर लीक; दोन दिवसांत दमदार कलेक्शन
लोकसभेच्या तयारीला लागा; राज ठाकरेंचे आदेश
यावेळी राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आदेशही दिले आहेत. राजकारणातील सध्याचा घोळ पाहता महापालिका निवडणुका होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. तसेच सरकार काय, सगळीकडेच संभ्रम असल्याचेही यावेळी राज ठाकरे म्हणाले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संभ्रम असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना सरकार काय, सगळीकडेच संभ्रम असल्याचेही यावेळी राज ठाकरे म्हणाले. तसेच “सरकार काय, पत्रकारितेतही कन्फ्युजनच आहे. कोण कुणाचा आहे हेच कळत नाही हल्ली. उलटा फिरला की लेबल कळतं मागे लागलेलं. कोणत्या पक्षाचा आहे ते. आजच्या बैठकीत लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने नियोजन करण्यात आल्याचे राज यांनी यावेळी सांगितले.