भाजप एक अजब पक्ष, सत्तेत असूनही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे; राज ठाकरेंचा हल्लाबोल

Raj Thackeray On Gokul : गोकुळ सत्तासंघर्षावरुन सध्या राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. राज्य सरकारने मोठा निर्णय घेत

Raj Thackeray On Gokul

Raj Thackeray On Gokul

Raj Thackeray On Gokul : गोकुळ सत्तासंघर्षावरुन सध्या राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. राज्य सरकारने मोठा निर्णय घेत गोकुळमध्ये शासननियुक्त चार संचालक नेमले आहे. सरकारने अध्यादेश काढून या संचालकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. यावरुन विरोध राज्य सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. तर दुसरीकडे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून देखील लोकशाही वाचवा अशी घोषणा देत मोर्चे काढण्यात येत आहे.

तर या मोर्च्यांवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जोरदार टीका करत भाजप (BJP) एक अजब पक्ष, सत्तेत असूनही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी गोकुळ प्रकरणावरुन देखील भाजपवर हल्लाबोल केला आहे. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार असं राज ठाकरे म्हणाले.

सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये राज ठाकरे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा एक अजब पक्ष आहे. जो खालपासून वरपर्यंत सत्तेत आहे तरीही लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहे. हे जगातील एकमेव उदाहरण असेल जिथे सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाच्या विरोधात मोर्चा काढतो. बरं लोकशाहीची बूज राखायची खरोखर इतकी इच्छा असेल तर गोकुळ प्रकरणात तुमच्या भाजप पॅनलचे 12 विरोधात सतेज पाटील पॅनलचे 13 जण निवडून आल्यावर लगेच तुम्ही सरकारचे ( म्हणजे तुमचेच) 5 संचालक का नेमले आणि त्यांना मतदानाचा अधिकार देऊन काय सिद्ध करताय तुम्ही ? बरं ते बॅलेट मतदान पद्धतीने आणि लोकशाही मार्गाने निवडणूक लढवून निवडून आले. तुम्हाला खरंच लोकशाहीची पर्वा किंवा काळजी वाटत असती तर हा असला प्रकार तुम्ही केला नसता. गोकुळवर तुम्हाला सत्ता मिळवता नाही आली म्हणून तुम्ही लगेच तुमची सगळी तत्त्व बाजूला ठेवणार आणि म्हणे लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढणार. सध्या महाराष्ट्रात पाण्याचा भीषण दुष्काळ आणि भारतीय जनता पक्षात समजूतदारपणाचा भीषण दुष्काळ एकाच वेळी कसा यावा, याचंच आश्चर्य वाटतं !

सत्तेत असताना ते लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढतील आणि स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील. यांच्या काळात अतिरेकी हल्ले झाले, कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणून दहशतवादापासून देश वाचवा यासाठी मोर्चे काढतील. देशाची अर्थव्यवस्था गाळात गेली आहे म्हणून आता अर्थव्यवस्था वाचवा साठी पण मोर्चे काढतील.

भारतीय जनता पक्षाने रडीचा डाव खेळणं बंद करावं. कुठल्या का मार्गाने तुम्ही जे बहुमत मिळवलं ते सर्व विरोधी पक्षांनी 12  वर्षे सहन केलं मग आता विरोधी पक्षांकडे या देशातील जनता झुकायला लागली आहे तर त्यापुढे भाजपाने पण सहन करायला शिकले पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले.

गोकुळ सत्तासंघर्ष; महायुतीत अंतर्गत वाद, शिवसेना आक्रमक? प्रकाश आबिटकर म्हणाले…

Exit mobile version