महाराजांना मळक्या कापडात गुंडाळलेलं पहावलं नाही; अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा दाखल…

नवी मुंबईतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनधिकृतपणे अनावरण केल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलायं.

Amit Thackeray

Amit Thackeray

Amit Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर नवी मुंबईत पहिला गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आलीयं. नवी मुंबईतील नेरुळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारुढ पुतळा उभारला. मागील अनेक महिन्यांपासून या पुतळ्याचं लोकार्पण रखडलं होतं. त्यामुळे पुतळा कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत होता. महाराजांना मळक्या कापडात गुंडाळलेलं मला पहावलं नसल्याने अनधिकृतपणे अमित ठाकरे यांच्यासह मनसैनिकांनी पुतळ्याचं अचानक अनावरण करण्यात आलंय. या प्रकरणी ठाकरे यांच्यासह 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आलायं.

अजित पवारांना न सांगता बिहारमध्ये उमेदवार? प्रफुल पटेल म्हणाले, पक्षाचे संघटन…

गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरे म्हणाले, महाराजांना मळक्या कापडात गुंडाळलेलं मला पहावलं नाही. म्हणून मी हे कृत्य केलं. माझ्या आयुष्यातील पहिला गुन्हा जर महाराजांसाठी होणार असेल तर त्याचा मला आनंद आहे, असे अमित ठाकरे यांनी म्हटले होते. त्यामुळे अमित ठाकरेंवर दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर नवी मुंबईतील राजकारण अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेरूळच्या राजीव गांधी पुलावरून उतरताच पूर्वेला असलेल्या चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा आणि संपूर्ण चौकाचे सौंदर्यीकरण जवळपास १.०६ कोटी रुपये खर्चून पूर्ण करण्यात आले आहे. यातील पुतळ्याच्या निर्मितीसाठी ४६ लाखांहून अधिक खर्च झाला आहे. काम पूर्ण झाल्यानंतरही पुतळा ४ महिन्यांहून अधिक काळापासून झाकून ठेवण्यात आल्याने शिवभक्तांसह स्थानिकांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र पुतळ्याचे लोकार्पणाबाबत महापालिकेच्या विविध विभागांकडून विसंगत माहिती दिली जात होती. उद्घाटन लांबणीवर गेल्याने प्रशासनावर जाणूनबुजून विलंब केल्याचा आरोप शिवभक्तांकडून केला जात होता.

ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या वही सिकंदर; उद्धव ठाकरेंचा बिहर विजयावरू भाजपला टोला

रविवारी दुपारी २.२४ वाजता मनसेने नेते अमित ठाकरे, शहराध्यक्ष गजानन काळे आणि कार्यकर्ते पुतळा असलेल्या चौकात पोहोचले. यावेळी पोलिसांनी आक्षेप व्यक्त करूनही कार्यकर्त्यांनी पुतळ्यावरील मळके कापड काढून पुतळ्यावर जलाभिषेक करत अमित ठाकरेंच्या हस्ते अनावरण केले. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

Exit mobile version