Download App

मला पिढीचंच आश्चर्य वाटतं… राज ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची आठवण

मला त्या काळातल्या पिढीचं आश्चर्य वाटतं कारण बाळासाहेब ठाकरे शेवटच्या क्षणापर्यंत शार्प होते, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे बोलत होते.

Kharghar Accident : सुधीर मुनगंटीवारांचा मोठा दावा, विरोधकांवर केला ‘हा’ आरोप…

राज ठाकरे म्हणाले, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या काळात मी त्यांच्यासोबतच होतो त्यावेळी उद्धव ठाकरेंची शस्त्रक्रिया झाली होती.

त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे येत असलेल्या लोकांना ते विसरत नव्हते. कोणताही व्यक्ती त्यांच्याकडे आल्यास त्या व्यक्तीविषयी त्यांना माहित असायचं, असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

Mann Ki Baat च्या 100 भागाच्या निमित्तानं येणार ‘हे’ खास नाणं

तसेच माझ्या आजोबांच्या वेळेलाही जे लोकं येत होते, त्यांनाही त्यांची नावे माहित असायची, माझे आजोबाही कधीच कोणाचं नाव विसरले नाहीत.

भूतकाळातलं सोडा, पण वर्तमान काळातलंही त्यांना चांगल्या प्रकारे माहित होतं. बाळासाहेबांनी मला एकदा बोलावून म्हणाले कपाटात वस्तू आहे ती घे आणि वापरुन बघ छान आहे, असं त्यांनी मला शेवटच्या काळातही सांगितलं होतं.

Loksabha 2024 : काँग्रेससोबत जायला तयार पण राहुल गांधी चेहरा नको; BRSची भूमिका

म्हणजे मला या पिढीचंच आश्चर्य वाटतं, विलक्षण वाटतं, पिढीतले शेवटपर्यंत शार्प होते. बाळासाहेबांसारखाच मी लता मंगेशकर, बाबासाहेब पुरंदरे यांच्याही जवळ होतो, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, शेवटच्या क्षणी यातील कोणीही कधीच कोणाचं नाव विसरले नसल्याचं सांगितलं आहे. मला असं चांगलं आठवत असून असं कधीही झालं नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय.

Tags

follow us