Download App

जपून राहावं, राज ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सल्ला

  • Written By: Last Updated:

Raj Thakaray On Eknatha Shinde and BJP : महाराष्ट्रातील (Maharashtra)सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराचा (Lokmat Maharashtrian of the Year Award)सोहळा आज सायंकाळी वरळीतील (Worli)एनएससीआय डोममध्ये पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)यांची राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)आणि समाजसेविका अमृता फडणवीस (Amrita Fadnavis)यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी ठाकरेंनी आपल्या शैलीत उत्तरं दिली आहेत. यावेळी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न विचारला त्यावर राज ठाकरे म्हणाले मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जपून राहण्याचा सल्ला देईल.

राज ठाकरे यांचा हा सल्ला देताना उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्याकडे रोष होता. सध्या राज्यात ज्या पद्धतीने अजित पवार यांच्या बद्दल बातम्या येत आहेत. त्यामुळे राज ठाकरे म्हणतात की अजित पवार कधी भाजपसोबत जातील आणि भाजप कधी शिंदेंना बाजूला करेल याचा नेम नाही म्हणून मी शिंदेंना जपून राहण्याचा सल्ला देतो. तसेच उद्धव ठाकरे यांच्या बद्दल देखील काही सांगता येत नाही. ते देखील भाजपाला हाताशी धरून शिंदेचा गेम करू शकतात त्यामुळे त्यांनी जपून राहणे आवश्यक आहे.

राज ठाकरे म्हणाले, मी आता तो विषय बंद करुन टाकलाय

पुढे राज ठाकरेंना फडणवीसां बद्दल विचारले असता ते म्हणतात फडणवीसांनी राज्यातले राजकारण आता बंद करावे आणि त्यांनी केंद्रात जावे. त्यांच्या सारख्या हुशार माणसाची जागा आता केंद्रात आहे. आपल्या महाराष्ट्राचे प्रश्न केंद्रात मांडण्यासाठी फडणवीसांन सारख्या उशीर माणसाची गरज आहे. त्यामुळे त्यांनी आता केंद्रात अधिक लक्ष दिले पाहिजे.

राज ठाकरेंना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या बद्दल विचारले असता ते म्हणता हे तर स्वयंभू आहेत यांना कोण काय सांगणार यांनी वाटते की आम्ही जे करू तेच खरं आहे. म्हणजे साऱ्या जगात हेच खरे आणि बाकीचे सगळे वेडे असे यावेळी राज ठाकरे म्हणाले.

Tags

follow us