राज ठाकरे म्हणाले, मी आता तो विषय बंद करुन टाकलाय

राज ठाकरे म्हणाले, मी आता तो विषय बंद करुन टाकलाय

Raj Thackeray On Shivsena : महाराष्ट्रातील (Maharashtra)सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराचा (Lokmat Maharashtrian of the Year Award)सोहळा आज सायंकाळी वरळीतील (Worli)एनएससीआय डोममध्ये पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)यांची राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)आणि समाजसेविका अमृता फडणवीस (Amrita Fadnavis)यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी ठाकरेंनी आपल्या शैलीत उत्तरं दिली आहेत. यावेळी अमृता फडणवीस यांनी त्यांना विचारले की, शिवसेनेची धुरा तुमच्या हाती असती असता तर आजची शिवसेनेची (Shiv Sena) परिस्थिती वेगळी असती का? त्यावर राज ठाकरे म्हणाले की, मी आता तो विषय बंद करुन टाकला आहे.

निवासी डॉक्टरांची व्यथा शरद पवारांच्या दारी… पवारांचा एका फोन आणि विषय संपला

मी धुरा सांभाळली असती तर काय झालं असतं, अशा गोष्टींना आता काही अर्थ नाही. ज्या गोष्टी आहेत, त्या आता तुमच्या समोर आहेत. जे सांभाळत आहेत ते सांभाळतील, असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. राज म्हणाले की, मी माझा पक्ष काढला आहे. तो मी चालवतोय. असंही ते यावेळी म्हणाले. माझं मी काय करतोय ते मला माहित आहे. त्यामुळे मला अजून कोणाच्या धुरा व्हायचं नाही, अशा स्पष्ट भाषेत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

यावेळी खासदार अमोल कोल्हेंनी प्रश्न केला की, महाराष्ट्रात दोन अशी व्यक्तीमत्व आहेत की. जी बोलली नाहीत तरीही बातमी होते आणि बोललीत तर हमखास ब्रेकींग न्यूज असते, त्यात एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे म्हणजे राज ठाकरे. ही दोन व्यक्तिमत्व आहेत की जी बसल्या जागी संपूर्ण राज्यातल्या देशातल्या मीडियाला कामाला लावू शकतात. हे मीडिया हँडल करण्याचं स्कील कसं आत्मसात केलं असा प्रश्न त्यांना विचारला.

त्यावर राज ठाकरे म्हणाले की, हे स्कील आत्मसात असं काही केलेलं नाही. मी आपला माझं काय बोलायचं ते बोलत असतो. तुम्हाला आठवत असेल की, मागे अमिताभ बच्चन यांचीपण जी काही कॉन्ट्रवर्सी झाली होती, खरं तर त्याच्यामध्ये मी काहीच बोललो नव्हतो. खरी कॉन्ट्रवर्सी तर ती नंतर झाली होती, जेव्हा मी माझं तोंड उघडलं तेव्हा. त्यावेळी मी काय म्हटलं होतं की, इतक्या मोठ्या कलाकाराला जर समजा कन्या शाळा काढावी असं वाटलं ती उत्तरप्रदेशमध्ये, निवडणुकीला उभं राहावं असं वाटलं ते उत्तरप्रदेशमध्ये, चित्रपटामध्ये भूमिका कराव्या वाटल्या त्या उत्तरप्रदेशमधील माणसाच्या कराव्याश्या वाटल्या. इतक्या मोठ्या कलावंताला जर आपल्या राज्याबद्दल प्रेम असेल तर राज ठाकरे अत्यंत छोटा माणूस आहे. त्याला स्वतःच्या राज्याबद्दल प्रेम नसेल का? हेच माझं वाक्य होतं. आता त्यात मीडियाला काय दिसलं मला माहित नाही. कदाचित मी जरा मोकळेपणाणे स्पष्टपणे बोलत असेल त्यामुळे तसं वाटत असेल असं मला वाटतं असंही ते म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube