Raju Shetty Interview With Letsupp Marathi : कोल्हापूरमधील (Kolhapur) नांदणी मठातील माधुरी ऊर्फ महादेवी हत्तीण पुन्हा मठात येण्याचा तोडगा निघालाय. यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Mahamarg) अन् राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) या वादावर बोलताना राजू शेट्टी यांनी ( Raju Shetty) म्हटलंय की, ते गप्प बसले. पाचशे एकरांची मालमत्ता आहेत, त्यावर मी त्यांना सांगितलं, बिंदू चौकात येतो. बिंदू चौक कोल्हापूरचा आमचा ऐतिहासिक चौक आहे. त्यांना म्हटलं, सातबारा घेवून या. मी बक्षिसपत्र घेवून गेलो होतो. फक्त गटनंबरचे कॉलम तेवढे रिकामे ठेवले होते. सगळ्यांसमोर सही केली होती, जेवढे गटनंबर ते घेवून येतील. त्याची नोटरी करून बक्षीसपत्र करून देईल. ते का आले, यावर त्यांनीच प्रकाश टाकला पाहिजे, असं देखील राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलंय.
शक्तिपीठ महामार्गाला विरोध
यावेळी त्यांनी कोल्हापूरकर शक्तिपीठ महामार्गाला का विरोध करत आहेत, ही भूमिका देखील स्पष्ट केली आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, जर कोल्हापूरकर विकासाला विरोध करत असते तर त्यांनी पुणे-बेंगलोर महामार्गाला देखील कोल्हापूरकांनी विरोध केला असता. नैसर्गिक न्यायालयाला धरून 2013 च्या कायद्याप्रमाणे आम्हाला मोबदला मिळावा. जिथे होणं गरजेचं आहे, तिथे मी आम्ही विरोध करत नाही. महापूरला कारणीभूत होतील, असे भराव टाकू नका.
VIDEO : वनताराच्या सल्लागार मंडळावर पेटाचे पदाधिकारी! राजू शेट्टींचा खळबळजनक खुलासा
हा भूर्दंड कशासाठी?
शक्तिपीठ महामार्ग नागपूर रत्नागिरी महामार्गाला समांतर आहे. समांतर असताना 27 हजार एकर जमीनपैकी 22 ते 23 हजार जमीन बागायती क्षेत्रातून जाते. आधीच नागपूर, रत्नागिरी महामार्ग बांधला आहे. साठ किलोमीटरवर एक टोलनाका बसवलेला आहे. तिथे 40 लाख टोल अपेक्षित असताना केवळ सहा ते सात लाखच टोल मिळत आहे. क्षमतेच्या केवळ 25 टक्के तो रस्ता चालत आहे, असं असताना त्याला समांतर असताना दुसरा रस्ता करायचा. यात शहाणपणा कसला आहे? हा सगळा रस्ता खासगीकरणातून होणार. सगळा टोल प्रवाशांना द्यावा लागणार, हा भूर्दंड कशासाठी? असा सवाल देखील राजू शेट्टी यांनी केलाय.
जर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री त्यांच्या निर्णयावर ठाम असतील, तर आम्ही देखील आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. साधं त्यांना रेखांकण करण्यासाठी 12 जिल्ह्यांत मोजणी करता आली नाही, असा टोला देखील यावेळी त्यांनी सरकारला लगावला.
इच्छाधारी नागाप्रमाणे भूमिका! लक्ष्मण हाकेंची शरद पवारांवर खोचक टीका
कुरेशी समाजाचं आंदोलन अन् जनावरांच्या कत्तली…
कुरेशी समाजाचं आंदोलन अन् जनावरांच्या कत्तलीवर बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, आपल्या संस्कृतीत गायीला फार महत्त्व आहे. देशी गाय आपली माता, देवी आहे. परंतु कायदा करत असताना सरकारने गोवंश हत्याबंदी असा कायदा केला. ज्यामध्ये म्हैस, संकरित गाय, बैल, रेडा सगळे आहेत. शेतकऱ्याची परिस्थिती नाकाला सूत लावल्यासारखी झाली आहे. अशा परिस्थितीत निरूपयोगी झालेल्या जनावरांचं काय करायचं? सरकारने स्लॉटरला परवानगी दिली आहे. परंतु वाहतुकीला परवानगी नाही? मग हा काय प्रकार आहे? असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
गोवंश हत्याबंदी कायद्याऐवजी, ‘शुद्ध देशी गाय हत्याबंदी कायदा’ असा करा. गोवंश कुठून काढला. रेडा अन् आमची म्हैस आमची एकाच वंशावळीतील आहे. कायदा करत असताना जरा तरी डोकं ठिकाणावर ठेवलं पाहिजे, असा टोला देखील राजू शेट्टी यांनी केलाय.