Download App

“हा अहंकार बरा नाही…” : शिस्त पालन समितीकडे पाठ फिरविल्याने शेट्टींचा तुपकरांवर संताप

बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर आहे. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची नाराजी अद्याप कायम आहे. अशात तुपकरांनी शिस्त पालन समितीच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तुपकरांवर चांगलाच संताप व्यक्त केला. त्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठीच शिस्त पालन समिती होती. मात्र या बैठकीकडे पाठ फिरणे हा अहंकार बरा नाही, असं म्हणतं शेट्टी तुपकरांवर चांगलेच भडकले. (Raju Shetty, president of Swabhimani Shetkar Sangathan expressed his anger on Ravikant Tupkar)

टीव्ही 9 मराठीशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, आजची बैठक ही रविकांत तुपकर यांनी ज्या काही तक्रारी केलेल्या आहेत, त्याबद्दल बोलविण्यात आली होती. तुपकरांनी संघटनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याकडे किंवा माझ्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांमधूनच या सर्व चर्चा ऐकत आहे. पण जर माझ्या कार्यपद्धतीबद्दलही आक्षेप असतील ते माझ्या उपस्थितीमध्ये किंवा अनुपस्थितीमध्ये समिती समोर मांडता येतात. समिती त्यासाठीच असते. मी समितीच्या समोर येणार नाही, हा अहंकार बरोबर नाही. मी स्वत: समितीच्या समोर येण्यास तयार आहे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Threat Call : एक-दोन दिवसांत अतिरेकी हल्ला! थेट मंत्रालयात खणखणला धमकीचा फोन

दरम्यान, लेट्सअप मराठीशी बोलताना रविकांत तुपकरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, शिस्त पालन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणं झालं आहे. मी शिस्तपालन समितीच्या बैठकीला जाणार नाही. गेल्या 5 वर्षांपासून मी माझं म्हणणं राजू शेट्टी यांच्याकडे मांडत आहे. पण त्यावर कृती होत नाही. त्यामुळे माझा नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप आहे. मात्र मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी संघटनेतच राहून शेतकऱ्यांचे काम करणार आहे, असेही तुपकर यांनी स्पष्ट केले.

‘आम्ही अजितदादांचं स्वागत केलं, जयंत पाटील आले तर’.. विखे पाटलांच्या वक्तव्याने आणला नवा ट्विस्ट!

माझे पंख छाटण्याचे प्रयत्न करु नयेत ;

दरम्यान, मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या शेतकरी संघटनेतील वाद आता टोकाला गेला आहे. शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत तुपकर यांनी संघटनेत राहूनच बंड पुकारलं आहे. नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत, परंतु नेतृत्वच जर कार्यकर्त्यांचे पंख छाटत असतील तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. त्यामुळे नेतृत्वाने माझे पंख छाटण्याचे प्रयत्न करु नयेत, असा थेट इशारा त्यांनी शेट्टी यांना दिला आहे. त्यानंतर शेट्टी यांच्याकडून शिस्त पालन समितीकडे तक्रार निवारण करण्याचे काम दिली होते.

Tags

follow us