Download App

Murder: कुख्यात गुंड राजू शिवशरण याचा दगडाने ठेचून खून, पुण्यातील रामटेकडी परिसरातील घटना

कुख्यात गुंड राजू शिवशरण याचा मध्यरात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. पुण्यातील रामटेकडी परिसरात ही घटना घडली.

  • Written By: Last Updated:

Pune Crime : पुण्यात कुख्यात गुंड राजू शिवशरण याचा मध्यरात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. येथील रामटेकडी परिसरात असलेल्या वंदे मातरम चौकात मध्यरात्री टोळक्यांकडून राजू शिवशरण याचा दगडाने ठेचून खून केला असल्याची बातमी समोर आली आहे. राजू शिवशरण हा रामटेकडी परिसरातील कुख्यात गुंड आहे. (Pune Crime) दरम्यान, राजू शिवशरण खून प्रकरणात वानवडी पोलिसांनी पाच संशयीताना ताब्यात घेतलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास रामटेकडीतील राजू शिवशरण्याचा पाठलाग करून खून केला आहे.

देशासाठी पदक जिंकल्याचा आनंदच पण आता; रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरजनं काय सांगितलं?

डोक्यात दगड घातला

शिवशरण आणि अल्पवयीन मुलं ओळखीचे आहेत. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास रामटेकडीतील वंदेमातरम चौकात शिवशरण आणि अल्पवयीन मुलांमध्ये दारूसाठी पैसे मागितल्याने वाद झाला. शिवशरण आणि मुलं दारू प्यायली होती. वादातून मुलांनी शिवशरणला मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलांनी शिवशरणच्या डोक्यात दगड घातला, तसंच त्याच्या डोक्यात दारूची बाटली फोडली.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली पोलिसांना मोठ यश; पुणे ISIS मॉड्यूलशी संबंधित दहशतवादी अटक

पोलीस निरीक्षक पतंगे यांची माहिती

या सगळ्या घटनेत शिवशरण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केलं. परंतु, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. वानवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी घटनास्थळी भेट दिली. अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, दारूसाठी पैसे मागितल्याने झालेल्या वादातून शिवशरणचा खून झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक पतंगे यांनी दिली आहे.

 

follow us