स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली पोलिसांना मोठ यश; पुणे ISIS मॉड्यूलशी संबंधित दहशतवादी अटक

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली पोलिसांना मोठ यश; पुणे ISIS मॉड्यूलशी संबंधित दहशतवादी अटक

Pune ISIS Terrorist Arrested : स्वातंत्र्यदिनाआधी राजधानी दिल्ली पोलिसांना मोठ यश आलं आहे. दहशतवाद्यांचा  मोठा कट उधळण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने इसीसच्या मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय. यामध्ये एका दहशतवाद्याला अटक केली आहे. (NIA) रिझवान अब्दुल हाजी अली असं दहशतवाद्याचं नाव आहे. रिझवान हा पुणे ISIS मॉड्यूलशी संबंधित होता. आयएसआयएसशी संबंधित दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल रिझवानवरती तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलं होतं.

Murder: कुख्यात गुंड राजू शिवशरण याचा दगडाने ठेचून खून, पुण्यातील रामटेकडी परिसरातील घटना

वॉरंटही जारी करण्यात आलं

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पुणे ISIS मॉड्यूलचा प्रमुख सदस्य रिझवान अब्दुल हाजी अली याला अटक केली. त्याच्यावर 3 लाख रुपयांचे बक्षीस होतं. रिझवान अब्दुल हाजी अली हा पुणे ISISI मॉड्यूलचा कुख्यात दहशतवादी असून त्याच्या अटकेसाठी एनआयएने वॉरंटही जारी केलं होतं. UAPA अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला असून रिझवानचे नेटवर्क नष्ट करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. रिझवान आणि अन्य दोन दहशतवादी मोस्ट वॉन्टेड यादीत होते.

हायप्रोफाईल भागांची रेकी

गतवर्षी पोलिसांनी पुणे ISIS मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. तेव्हापासून रिझवान अब्दुल हाजी अली हा फरार झाला होता. तो दिल्लीतील दर्यागंज येथील रहिवासी असून, इतर सहकाऱ्यांसह त्याने दिल्लीसह मुंबईतील अनेक हायप्रोफाईल भागांची रेकी केली होती. आता त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून शस्त्रेही जप्त करण्यात आल्याचं वृत्त आहे.

मोठी बातमी : मनीष सिसोदिया यांना 17 महिन्यांनंतर मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

मोस्ट वाँटेड यादीत समावेश

रिजवान अलीचा एनआयएच्या मोस्ट वाँटेड यादीत दहशतवादी म्हणून समावेश होता. पुणे ISIS मॉड्यूलच्या अनेक सदस्यांना पुणे पोलीस आणि एनआयएने यापूर्वी अटक केली होती. या वर्षी मार्चमध्ये दहशतवाद विरोधी एजन्सीने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात रिझवानच्या नावासह अन्य तीन आरोपींचाही समावेश होता. एनआयएने पुणे ISIS मॉड्यूल प्रकरणात एकूण 11 आरोपींवर आरोप ठेवले आहेत. हे प्रकरण पुण्यातील महाराष्ट्रातील ISIS शी संबंधित शस्त्रे, स्फोटके, रसायने आणि साहित्य जप्त करण्याशी संबंधित आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या