Download App

विखेंना शह, रोहित पवारांना टेन्शन; राम शिंदेंना मिळणार मोठी जबाबदारी?

  • Written By: Last Updated:

NCP Leader Ram Shinde will get a big responsibility : शिवसेना (UBT) गटात असलेल्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत आणि राष्ट्रवादीच्या 6 आमदारांनी सत्ताधारी अजित पवार गटाला साथ दिली आहे. त्यामुळे विधान परिषदेतील बहुमताचे संख्याबळ सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झुकले आहे. यानंतर आता सभापतीपदी सत्ताधारी गटातील आमदाराची वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.

मागील अनेक दिवसांपासून विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. या रिक्त जागेची या अधिवेशनात निवडणूक लागण्याची शक्यता आहे. याच जागेवर भाजपकडून आमदार राम शिंदे यांना संधी देण्यात येणार असल्याचे खात्रीलायक सुत्रांनी सांगितले आहे. विधान परिषदेत भाजपचे सध्या 22 आमदार आहेत. त्यापैकी 8 आमदारांच्या सदस्यत्वाची मुदत 2024 मध्ये संपत आहे.

इतर 14 जणांपैकी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. तर अन्य 13 जणांमध्ये तरुण, अनुभवी आणि सदस्यत्वाची बहुतांश मुदत शिल्लक असलेला नेता म्हणून राम शिंदे यांचे नाव चर्चेत आले आहे. याशिवाय राम शिंदे यांना ताकद देऊन अहमदनगरमध्ये भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना शह देता येऊ शकतो अशाही चर्चा सध्या भाजपच्या गोटात सुरु असल्याचं बोललं जात ाहे.

गेल्या वर्ष भरापासून शिंदे – फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आहे. परंतु त्यांच्याकडे विधान परिषदेत बहुमत नसल्याने विधान परिषदेचे सभापती पद हे विरोधकांकडे होते. रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सभापतीपदाची सुत्रे सोपविण्यात आली होती. परंतु आता विरोधकांकडील विधानपरिषदेतील आमदार सत्तेत असणाऱ्या पक्षात सहभागी झाले. त्यामुळे विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांचे बहुमत झाले आहे.

अजित पवार गटाचे आमदार आज ना उद्या अपात्र होणारच; आव्हाडांचे मोठे वक्तव्य

भाजप अहमदनगरचे आमदार राम शिंदे यांमा सभापती करणार की हा मान अजित पवार गटात असलेले आणि विधासभा अध्यक्षांचे सासरे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना मिळणार अशी चर्चा सुरु आहे. अजित पवार गटाला या पदाचे आश्वासन दिले आहे काय यांची उत्सुकता भाजपमधील नेत्यांना देखील आहे. दरम्यान, जर रामराजे नाईक निंबाळकर हे सभापती झाले तर पुन्हा एकदा विधिमंडळात सासरे – जावयाची जोडी पाहायला मिळेल.

Tags

follow us