Ramdas Athawale Offers Abhijit Dipke RPI Post : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांनी केलेल्या कामाचं कौतुक करत आठवले यांनी त्यांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिलं. विशेष म्हणजे, दिपके यांनी रिपब्लिकन पार्टीत प्रवेश केल्यास त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्याची तयारी असल्याचंही आठवले यांनी स्पष्ट केलं.
अभिजीत दिपकेंच्या कामाचं आठवलेंकडून कौतुक
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी अभिजीत दिपके यांनी घेतलेली भूमिका आणि केलेल्या आंदोलनाची दखल रामदास आठवले यांनी घेतली. त्यांच्या कामाचं कौतुक करताना आठवले यांनी दिपकेंना रिपब्लिकन पार्टीमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली.
दिपके यांनी पक्षात प्रवेश केल्यास त्यांना युवक संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, असंही आठवले यांनी सांगितलं. विशेषतः ‘राष्ट्रीय यूथ’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची तयारी असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
‘कॉकरोच जनता पार्टीमध्येच ठीक’
रामदास आठवले यांनी दिलेल्या ऑफरबद्दल अभिजीत दिपके यांनी त्यांचे आभार मानले. मात्र, सध्या कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा आपला विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
“तुम्ही माझ्या कामाची दखल घेतली आणि मला पक्षात येण्याची ऑफर दिली, याबद्दल मी आभारी आहे. मात्र, मी कॉकरोच जनता पार्टीमध्येच ठीक आहे,” अशा शब्दांत दिपके यांनी आठवलेंच्या ऑफरला नम्रपणे नकार दिला.
वडिलांच्या डोळ्यासमोर 11 वर्षीय चिमुकल्याने जीव सोडला, पुण्यात खड्ड्याचा आणखी एक बळी
दरम्यान, अभिजीत दिपके हे ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या माध्यमातून विविध सामाजिक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडताना दिसतात. त्यामुळे रिपब्लिकन पार्टीकडून मिळालेली ऑफर स्वीकारण्याऐवजी त्यांनी आपल्या कॉकरोच जनता पार्टीमधूनच काम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
