Sambhaji Patil Nilangekar Campaign : काँग्रेसने पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हरवल. त्यामुळे बाबासाहेबांनी विचार केला की आपल्याला व्यापक विचारांचा पक्ष स्थापन करावा लागेल. (Sambhaji Patil) त्यामुळे त्यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेता येईल या विचारातून रिपब्लीकन पक्षाचा विचार समोर आला. दुर्दैवाने बाबासाहेबांचं निधन झाल्यानंतर रिपब्लीकन पक्षाची स्थापना झाली आहे. त्यामुळे येत्या काळात तुम्ही या गोष्टी लक्षात ठेऊन तुम्ही भाजपच्या उमेदवारांच्या मागं उभ रहा असं आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे. ते संभाजीपाटील निलंगेकर यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
गेली 60 ते 70 सरकारमध्ये होते. त्यावेळी काँग्रेसने जातीय जनगणना करण्याची भूमिका का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित करत आठवले यांनी राहुल गांधींवर जोरदा घणाघात केला आहे. दरम्यान, मोदी यांच्या काळात चांगलं काम होत आहे. पंतप्रधान मोदी यांनी संविधानावर माथा टेकून शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात संविधानाला काही धोका नाही. कारण त्यांच्यासोबत मी आहे असंही आठवले यावेळी म्हणाले आहेत.
संभाजी पाटील निलंगेकरांच्या प्रचारात प्रचंड गर्दी; आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून डोर टू डोर संवाद
गेली आठ वर्षापासून मी मंत्री आहे. पुढेली मी मंत्रा राहणार आहे. कारण मोदी आहेत तोपर्यंत मी आहे. आणि मी आहे तोपर्यंत मोदी आहेत असंही आठवले यावेळी म्हणाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी संभाजी पाटील निलंगेकर यांचा प्रचारही केला. हा प्रचार करताना आठवले यांनी कवीतेच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. हे सर्व निळ दिसत आहे आकास आणि निलंगेकर यांच्यामुळे झाला आहे विकास अशी कवीता करत आठवले यांनी जोरदार भाषण केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा पुतळा मोदी यांच्या काळात झाली आहेत. माजी खासदार श्रुंगारे काँग्रेसमध्ये गेले त्यावरही आठवले यांनी जोरदार टीका केली आहे. संविधानाच्या प्रचारामुळे गडबड झाली. अन्यथा श्रृंगारे निवडून आले असते. परंतु, त्यांना तिकडं काय मिळणार आहे मला माहिती नाही. परंतु, त्यांनी तिकडे जाण्याचा का निर्णय घेतला हे काही कळयला मार्ग नाही असही आठवले यावेळी म्हणाले आहेत.