प्रकाश आंबेडकरांच्या 12-12 च्या फॉर्मुल्याचे आम्ही बारा वाजवू; रामदास आठवलेंनी डिवचले

प्रकाश आंबेडकरांच्या 12-12 च्या फॉर्मुल्याचे आम्ही बारा वाजवू; रामदास आठवलेंनी डिवचले

Ramdas Athavale on Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) युती करायची असेल तर महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) करावी. म्हणजे 12-12 चा फॉर्मुला ठरला तर आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील, अशी खोचक प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी दिली. रामदास आठवले आज धुळे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर जोरदार हल्लाबोल केला.

मराठा समाजाला आरक्षण देणे म्हणजे सगळ्याचं मराठा समाजाला आरक्षण देणे असा त्याचा अर्थ होत नाही. संपूर्ण ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही, ज्यांचे उत्पन्न आठ लाखाच्या आत आहे त्यांना आरक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे मराठा समाजाला देखील आर्थिक निकषांच्या आधारावर आरक्षण मिळावे, अशी मागणी जरांगे पाटील यांची आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

ते पुढं म्हणाले की छगन भुजबळ हे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध करीत आहेत, त्याला आमचा पाठिंबा आहे. सगळ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी नसून गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीला आमचा पाठिंबा आहे. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यातील वाद मिटवावा तसेच मराठा समाजाच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

Nana Patole : अजित पवारांच्या हातात काही नाही, बोलावं लागतं म्हणून बोलतात; पटोलेंचा टोला

वंचित आणि ठाकरे गटाची युती झालेली आहे की नाही आपल्याला माहित नाही, मात्र प्रकाश आंबेडकरांना युती करायची असेल तर महाविकास आघाडी सोबत करावी, ठाकरेंसोबत करु नये. महाविकास आघाडीसोबत त्यांचा 12-12 चा फॉर्मुला ठरला आहे. तो अतिशय योग्य असून आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील, अशी खोचक टीका रामदास आठवले यांनी केली.

Maharashtra Politics : ’30 दिवसांत ऑपरेशन लोटस, काँग्रेसही फुटणार?’ दमानियांच्या दाव्याने खळबळ !

2024 च्या निवडणुकीत आम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही. इंडिया आघाडीने आम्हाला किती हरवण्याचे प्रयत्न केले तरी आमचाच विजय होईल. इंडिया आघाडीला आम्हाला हरवण्याचा अधिकार असला तरी सुद्धा मतदार जनता त्यांच्या बाजूने गेली तरच आम्ही हरवू शकतात मात्र मतदार जनता आमच्या सोबत असल्यामुळे आमचा हरण्याचा प्रश्नच येत नाही, असा आत्मविश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube