साईबाबांच्या शिर्डीत राजकीय चमत्कार घडणार

  • Written By: Published:
साईबाबांच्या शिर्डीत राजकीय चमत्कार घडणार

अहमदनगर – साईबाबांच्या पुनीत वास्तव्याने देशभर प्रसिद्ध असलेला शिर्डी (Shirdi) मतदारसंघ राजकीय चमत्कारांसाठी पण प्रसिद्ध आहे. गेल्या तीन निवडणुकांत अनेक नवी समीकरणे या मतदारसंघात तयार झाली आणि विरली. शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हटला की आठवतो तो रामदास आठवले (Ramdas Athavale) यांचा २००९ मधील पराभव. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात विखेंचा पाठिंबा मिळाला की आपला विजय पक्का असे समीकरण दृढ झाले आहे. पण कधीकधी या समजुतीला धक्काही बसतो. तर या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. इच्छुकांनी आपल्या बाह्या सरसावल्या आहेत. पण अध्यात्मिक चमत्काराची ख्याती असलेल्या शिर्डीत यंदा राजकीय जुळवाजुळव अशी सुरू आहे की ती चमत्काराशिवाय कमी नसेल.

“अकेला देवेंद्र क्या करेगा?” दुसऱ्या निवडणुकीपूर्वीच फडणवीसांनी बदला पूर्ण केला!

या मतदारसंघात शिवसेनेचे शिंदे गटाचे सदाशिवराव लोखंडे हे विद्यमान खासदार आहे. लोखंडे यांचा राजकीय प्रवासही असाच चमत्कारांनी भरलेला आहे. मुंबईत वास्तव्यास असलेले लोखंडे नशिबाच्या जोरावर दोन वेळा सहज खासदार झाले. त्यांना आता पुन्हा आपले नशीब साथ देईल, असा विश्वास वाटतो आहे. दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना २००९ च्या पराभवाची जखम धुवून काढायची आहे. त्यामुळे त्यांचेही शिर्डीतील दौरे वाढले आहेत. या मतदारसंघात २००९ मध्ये काॅंग्रेस-राष्ट्रवादी आणि रिपाई युतीचे उमेदवार असलेल्या आठवले यांचा अनपेक्षित पराभव झाला होता. विखे यांचे पाठबळ असूनही आपला पराभव झाला, याची सल त्यांना अजून आहे. त्यामुळेच ते २०२४ मध्ये पुन्हा लोकसभेत जाण्याचे स्वप्न पाहत आहेत. महायुतीचा कोण उमेदवार असणार, याची उत्सुकता असतानाच या युतीला अनपेक्षित वळण मिळण्याची चिन्हे आहेत.

काल सरकारचे ‘बाळराजे’ कोठे होते? सुलतानपूर रिसॉर्ट अन् साग्रसंगीत कार्यक्रमावरुन राऊतांची टीका

या वळणावर उभी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. मनसेला महायुतीत कसे सहभागी करून घ्यायचे याचा खल सध्या भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत सुरू आहे. मनसेशी अधिकृत युती करायला भाजपचा ठाम नकार आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना राज ठाकरे यांची साथ आवश्यक वाटते. त्यातूनच मग शिर्डी लोकसभा मतदारसंघ मनसेकडे देण्यासाठीची खलबते सुरू आहेत. या मतदारसंघात मग महायुतीचा अधिकृत उमेदवार रिंगणात ठेवायचा नाही, अशी ही रणनीती आहे. त्याऐवजी भाजप- शिंदे गटाने मनसेला पाठिंबा द्यायचा, असे सारे गणित आहे. मग या मतदारसंघात मनसे विरुद्ध महाविकास आघाडी अशी मग लढत होऊ शकेल.

Top 5 Movie: ‘बर्लिन ते द बकिंगहॅम मर्डर्स’ 2024 मध्ये पाहण्यासारखे टॉप 5 थ्रिलर

मनसेकडून या मतदारसंघासाठी बाळ नांदगावकर यांचे नाव आघाडीवर आहे. राज यांचे निष्ठावान सैनिक म्हणून नांदगावकर यांची राज्यभर ओळख आहे. मुंबईतील माझगाव विधानसभा मतदारसंघात छगन भुजबळ यांचा १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव त्यांनी केला होता. त्यामुळे जायंट किलर म्हणूनही त्यांची ख्याती आहे. भाजप-शिवसेना युतीत गृहराज्यमंत्री म्हणूनही त्यांना संधी मिळाली होती. नांदगावकरांच्या रूपाने मनसेला पहिला खासदार मिळू शकतो, अशी आशा मनसैनिकांना आहे.

Lok Sabha 2024 : ‘यूपी’त ‘इंडिया’ला धक्का, मोठा नेता साथ सोडणार?; शिवपाल यादवांनी स्पष्टच सांगितलं

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेत शिर्डी लोकसभा मतदारसंघ मनसेने लढवावा, अशी मागणी त्यामुळेच केली आहे. मनसे पदाधिकारी शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत अचानक पुढे आल्याने इतर राजकीय पक्षही सावध झाले आहेत.

सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज, चाहते फिदा..पाहा फोटो

भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा मुद्दा राज ठाकरे यांनीही आपलासा केला आहे. बाबरी मशीद पाडण्याच्या आंदोलनात बाळा नांदगावकर सहभागी झाले होते. तेथून आणलेली वीट त्यांनी राज ठाकरे यांना नुकतीच भेट दिली. या भेटीबद्दल राज यांनी भावनात्मक पोस्ट सोशल मिडियात लिहिली. त्यातून योग्य तो राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न दिसून आला. या साऱ्या परिस्थितीत हिंदुत्वाचा मुद्दा भाजप आणि मनसेला एकत्र आणू शकतो. मात्र मनसेचा परप्रांतीयांना विरोधाचा मुद्दा भाजपला उत्तर भारतात अडचणीचा आहे. त्यामुळे मनसेशी उघडपणे युती करण्यात भाजप अनुकूल आहेत. त्याऐवजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत मनसेने युती करावी, असा पर्याय पुढे आला आहे. याच प्रस्तावानुसार मनसेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ देण्याचा निर्णय होईल.

Pawar Vs Pawar : पक्ष, चिन्हानंतर आता अजितदादांचा डोळा ‘मलईदार’ कार्यालय अन् फंडांवर?

नांदगावकर यांना येथील लढत सोपी होण्यासाठी विखे कुटुंबाचा पाठिंबा आवश्यक आहे. मात्र त्या पातळीवरही अनुकूलता असल्याचे सांगण्यात येत आहे. विखे यांच्या स्थानिक राजकारणात हस्तक्षेप करण्याची भूमिका नांदगावकरांची नसेल. त्यामुळे विखे यांनाही स्थानिक राजकारणात नांदगावकरांचा अडथळा नसेल. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सध्या तरी सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. या साऱ्या घडामोडी नियोजनाप्रमाणे पार पडल्या तर मनसेसाठी ही संजीवनी ठरू शकेल. साईबाबा हे मनसेला आणि नांदगावकरांना पावणार का, हेच आता पुढील काळात पाहायचे आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज