Lok Sabha 2024 : ‘यूपी’त ‘इंडिया’ला धक्का, मोठा नेता साथ सोडणार?; शिवपाल यादवांनी स्पष्टच सांगितलं

Lok Sabha 2024 : ‘यूपी’त ‘इंडिया’ला धक्का, मोठा नेता साथ सोडणार?; शिवपाल यादवांनी स्पष्टच सांगितलं

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच (Lok Sabha Election 2024) विरोधकांच्या इंडिया आघाडीला रोजच झटके बसू लागले आहेत. आधी ममता बॅनर्जी नंतर नितीश कुमार (Nitish Kumar) आणि आता उत्तर प्रदेशातही धुसफूस (Uttar Pradesh) सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोक दल समाजवादी पार्टी आणि इंडिया आघाडीला (INDIA Alliance) सोडचिठ्ठी देऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जयंत चौधरी (Jayant Chaudhary) यांच्या नेतृत्वातील आरएलडी भाजप नेतृत्वातील एनडीएत सहभागी होऊ शकतो. या घडामोडी सुरू असतानाच समाजवादी पार्टीचे नेते शिवपाल यादव (Shivpal Yadav) यांनी जयंत चौधरी यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.

जयंत चौधरी लवकरच इंडिया आघाडीला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांवर यादव म्हणाले, जयंत चौधरी कुठेही जाणार नाहीत. मी जयंत चौधरी यांना चांगला ओळखतो. ते धर्मनिरपेक्ष आहेत. भाजप फक्त दिशाभूल करण्याचे काम करत आहे. अशा परिस्थितीत जयंत चौधरी इंडिया आघाडीतच राहतील आणि आम्ही एकत्रित लढून भाजपाचा पराभव करू.

Loksabha Election 2024 : इंडिया आघाडीला धक्का; लोकसभेसाठी मायावतींचा ‘एकला चलो रे’चा नारा

शिवपाल यादव यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे ज्यावेळी जयंत चौधरी इंडिया आघाडी सोडणार असल्याचा चर्चांनी जोर धरला आहे. आता तर असे सांगितले जात आहे की भाजपाने जयंत चौधरी यांना दोन ते तीन जागांची ऑफर दिली आहे. यासोबतच राज्यसभेतही एक जागा दिली जाणार आहे. दुसरीकडे आरएलडी प्रमुखांनी त्यांचे आगामी दोन मोठे कार्यक्रम रद्द केले आहेत. या घडामोडींमुळे चौधरी लवकरच इंडिया आघाडीची साथ सोडतील अशा अटकळी बांधल्या जात आहेत.

समाजवादी पार्टीने (Samajwadi Party) जो जागावाटपाचा फॉर्म्यूला दिला आहे त्यावर जयंत चौधरी चांगलेच नाराज झाले आहेत. सपाने आरएलडीला (RLD) सात जागा देण्याची घोषणा केली आहे. यापैकी चार जागा अशा आहेत जिथे सपाच्या उमेदवारांना आरएलडीच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे आरएलडीचे कार्यकर्ते आणि जाट मतदारांमध्ये नाराजी पसरली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आरएलडीने तीन जागांवर उमेदवार दिले होते मात्र, या तिन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला होता.

अखेर INDIA आघाडीचे घोडे गंगेत न्हाले; उत्तर-प्रदेशमध्ये सपा-काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज