Shirdi : साईचरणी भक्तांकडून भरभरुन देणगी; अकरा दिवसांत १६ कोटींचं दान

Shirdi : साईचरणी भक्तांकडून भरभरुन देणगी; अकरा दिवसांत १६ कोटींचं दान

Shirdi Saibaba Charity : श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात (Shirdi Saibaba) दररोज देशभरातील साईभक्त हजेरी लावत असतात आणि साई चरणी भरभरून दान देखील करतात. नाताळच्या सुट्ट्यांनिमित्त शिर्डीत साई दर्शनाला आलेल्या देशभरातील भाविकांच्यावतीने साईचरणी भरभरून दान देण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत आलेल्या भक्तांनी साईचरणी जवळपास १६ कोटींचे दान केले आहे.

शिर्डीतील साईबाबा संस्थानतर्फे नववर्षाच्या स्‍वागतानिमित्त (New Year 2024) आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवात २३ डिसेंबर २०२३ ते दिनांक १ जानेवारी २०२४ याकालावधीत सुमारे ८ लाखांहून अधिक साईभक्‍तांनी साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. या कालावधीत सुमारे १५.९५ कोटी रुपये देणगी प्राप्‍त झाली आहे, अशी माहिती संस्‍थानचे प्र. मुख्‍य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली.

Shirdi : मोठी बातमी! पास असेल तरच मिळेल साईबाबांचे दर्शन; न्यायालयाचे आदेश काय?

हुलवळे म्‍हणाले, ”नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्‍वागतानिमित्त २३ डिसेंबर ते १ जानेवारी २०२४ या काळात आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाच्‍या कालावधीत दानपेटीतून ७, ८०,४४,२६५ रुपये, देणगी काउंटरद्वारे ३,५३,८८,४७६ रुपये, डेबीट क्रेडीट कार्ड, ऑनलाइन देणगी, चेक, डिडी व मनी ऑडरद्वारे ४,२१,४०,८९३ रुपये अशी एकूण १५ कोटी ५५ लाख ७३ हजार ६३४ रुपये देणगी रोख स्‍वरुपात प्राप्‍त झालेली आहे. तसेच सोने ५८६.३७० ग्रॅम (रुपये ३२,४५,२९५) व चांदी १३ किलो ४१६ ग्रॅम (रुपये ०७,६७,३४६) देणगी प्राप्‍त झालेली आहे. अशाप्रकारे विविध माध्‍यमातून एकूण १५ कोटी ९५ लाख ८६ हजार २७५ रुपये देणगी संस्‍थानला प्राप्‍त झालेली आहे.

महोत्सवाच्या कालावधीत साई प्रसादालयात ६ लाखांहून अधिक साईभक्‍तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. तर सुमारे १ लाख २५ हजाराहून अधिक साईभक्‍तांनी अन्‍न पाकीटांचा लाभ घेतला आहे. याबरोबरच ११,१०,६०० लाडू प्रसाद पाकिटांची विक्री करण्‍यात आली आहे. याद्वारे १ कोटी ४१ लाख ५५ हजार ५०० रुपये प्राप्‍त झालेले आहे. याबरोबरच ७,४६,४०० साईभक्‍तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला.

PM Modi Shirdi Visit : पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीला PM मोदींकडून बूस्टर डोस; शिर्डीत वाचला यशाचा पाढा

साईबाबा संस्‍थानतर्फे प्राप्‍त झालेल्‍या दानाचा विनियोग हा साईबाबा हॉस्पिटल व साईनाथ रुग्‍णालय, साईप्रसादालय मोफत भोजन, संस्‍थानच्‍या विविध शैक्षणिक संस्‍था, बाह्य रुग्‍णांना चॅरिटीकरिता, साईभक्‍तांच्‍या सुविधांकरिता उभारण्‍यात येणारे विविध उपक्रम व विविध सामाजिक कामाकरता करण्‍यात येत असल्‍याचं हुलवळे यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज