शिर्डीतील साईबाबा मंदिर बॉम्बने उडवून देणार, संस्थानला धमकीचा मेल, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

शिर्डीतील साईबाबा मंदिर बॉम्बने उडवून देणार, संस्थानला धमकीचा मेल, पोलिसांनी बंदोबस्त वाढवला

अहिल्यानगर : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटनस्थळांवर जाण्यास पर्यटक भयभीत होत आहे. तर आता जगविख्यात शिर्डी (Shirdi) येथील साईबाबांचे मंदिर (Sai Baba Temple) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता धार्मिक स्थळ असलेल्या शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अजितदादांची CM होण्याची इच्छा, जयंत पाटील म्हणाले, ‘पाच वर्ष तरी शक्य नाही…’ 

अज्ञात व्यक्तीने साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे. शुक्रवारी (ता.२) सकाळी ईमेलद्वारे साईबाबा संस्थानला ही धमकी देण्यात आली. या प्रकारामुळे साई संस्थान आणि स्थानिक पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

धमकीचा मेल दक्षिण भारतातून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. साई संस्थानकडून आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू सरकारला संपर्क करणे सुरु आहे. साई मंदिर सुरक्षा प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रोहीदास माळी यांनी शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून सतर्कता म्हणून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पाकिस्तानला हादरवणारी बातमी! ‘या’ शहरातील इमारतींवर बलूच बंडखोरांचा कब्जा; काय घडलं? 

सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
धमकीचा ईमेल आल्यानंतर शिर्डी मंदिर परिसरातील सुरक्षा यंत्रणांत एकच खळबळ माजली आहे. या धमकीनंतर पोलिसांनी मंदिर परिसराची तपासणी करून तेथील सुरक्षा व्यवस्था चोख केली आहे. हा खरेच धमकीचा ईमेल आहे की, कुणी खोडसाळपणा केला आहे, याचा तपास पोलिस घेत आहेत. साई मंदिराची सुरक्षा व्यवस्था देखील अलर्टवर आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी कालच घेतले होते दर्शन

शुक्रवारीच केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी साईसमाधीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांनी पहलगाम हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानला कसे प्रत्युत्तर दिलं जाईल, हे तुम्ही पहाच, असं सूचक विधान केलं होतं. त्यानंतर काही तासातच साई संस्थानला धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube