Shirdi News : साईंच्या दर्शनानं नवं वर्षाची सुरुवात, शिर्डीत लाखो भाविकांची अलोट गर्दी

Shirdi : साईचरणी भक्तांकडून भरभरुन देणगी; अकरा दिवसांत १६ कोटींचं दान

अहमदनगर : साईबाबांच्या (Sai Baba) दर्शनानं नव्या वर्षाची सुरुवात करण्यासाठी शिर्डीत (Shirdi) भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. लाखो साईभक्त शिर्डीत नवं वर्षाच्या (New year) पूर्वसंधेला दाखल झाले होते. भक्तांसाठी रात्रभर साईमंदिर खुलं ठेवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे ३१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता साईंच्या मंदिरात मोठी गर्दी झाली होती. 12 वाजताच साईंचा गजर करत भक्तांनी नव वर्षाचे स्वागत केलं. त्यामुळं शिर्डीतले सगळे रस्ते गर्दीने फुलुन गेले होते.

खुशखबर! आता एमटीडीसी रिसॉर्टमध्येही महिलांना ५० टक्के सवलत, कधी पर्यंत घेता येणार लाभ?

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जगभर ख्याती असलेल्या नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे भाविक वर्षात स्वागत करण्यासाठी साई दरबारात हजेरी लावतात. कालही साईभक्तांनी श्री साईबाबा यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. साई नामाच्या जयघोषाने साई नगरी दुमदुमून गेली आहे. सलग आलेल्या सुट्यांमुळे मोठ्या संख्येने भाविक शिर्डीत दाखल होते. त्यामुळं शिर्डी हाऊफुल्ल झाली आहे. संभाव्य गर्दी पाहता मंदिर प्रशासनाकडून देखील योग्य नियोजन करण्यात आले आहे. देशभरातून आलेल्या साई भक्तांना दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी साई समाधी मंदिर रात्रभर उघडं ठेवण्यात आलं होतं.

‘कॉन्ट्रॅक्टमध्ये भांडण्याची अट…’; दिग्दर्शकांनी सांगितला नानाबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाले… 

पूर्व संध्येला मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले असल्याने लाखोंच्या संख्येने भाविकांनी साईंचे दर्शन घेतले. सकाळपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत.

नवीन वर्ष लागलं की, नवीन कॅलेंडर डायरी खरेदी केली जाते. साईबाबा संस्थानने प्रकाशित केलेली डायरी आणि कॅलेंडर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले.

नवीन वर्षात नवे संकल्प करण्यासाठी लाखो भक्त साईंच्या दरबारात नतमस्तक होतात. ख्रिसमसपासून नववर्षापर्यंत शिर्डी भाविकांनी फुलून जाते. भाविकांची वाढती गर्दी पाहता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, देशभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन.1 ने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातही या नवीन प्रकाराचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर साई संस्थाही सतर्क झाले आहे. मंदिर परिसरात ‘नो मास्क, नो दर्शन’ असा फलक झळकले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोरोनाबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, आता मंदिरांच्या प्रवेशद्वारावर कोरोना संदर्भातील फलक लागले आहेत. अनेक भाविक मास्क घालून साई समाधीचं दर्शन घेण्यासाठी जात आहेत.

follow us