खुशखबर! आता एमटीडीसी रिसॉर्टमध्येही महिलांना ५० टक्के सवलत, कधी पर्यंत घेता येणार लाभ?

खुशखबर! आता एमटीडीसी रिसॉर्टमध्येही महिलांना ५० टक्के सवलत, कधी पर्यंत घेता येणार लाभ?

50 percent discount in MTDC Resort : काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने महिलांना एसटी महामंडळाच्या प्रवासासाठी तिकिटांत ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता एमटीडीसी रिसॉर्टमध्येही (MTDC Resort) महिलांनाही ५० टक्के सवलत मिळणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली.

‘कॉन्ट्रॅक्टमध्ये भांडण्याची अट…’; दिग्दर्शकांनी सांगितला नानाबद्दलचा ‘तो’ किस्सा; म्हणाले… 

पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांना सांगिलते की, राज्य सरकारच्या महिला केंद्रीत पर्यटन धोरणानुसार महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत (एमटीडीसी) महिला पर्यटक आणि महिला उद्योजकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या धोरणांतर्गत आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला पर्यटकांसाठी खास ऑफर आहे. येत्या 1 ते 8 मार्च 2024 या कालावधीत महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांना 50 टक्के सवलत दिली जाणार असल्याचं ते म्हणाले.

INDIA आघाडीत सहभाही होण्याच्या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘आत्ता तरी आमच्यासाठी….’

महामंडळाकडे एकूण 34 पर्यटन निवासे, 27 रेस्टॉरंट्स असून निवास आणि नाश्ता, मेगा टूर, कलाग्राम, अभ्यागत केंद्र, इको यासारखे अनुभवात्मक उपक्रम आहेत. याशिवाय अलीकडेच एमटीडीसीने जबाबदार पर्यटनाअंतर्गत मोठी चळवळ सुरू केली आहे. त्याचप्रमाणे, बीच रिसॉर्ड, हिल रिसॉर्ड, जंगल रिसॉर्ट असे विविध पध्दतीचे पर्यटक निवास व उपरारगृहे तसेच बोट क्लब, स्कुबा डायव्हिंग आदी जलक्रीडा केंद्र पर्यटकांना आकर्षित करतात. महिलांसाठीच्या सवलातीचा पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाजन यांनी केले.

दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या www.mtdc.co या अधिकृत वेबसाइटवर बुकींग करता येणार आहे. या ऑफरसाठी काही अटी आणि नियम आहेत. ही सवलत फक्त महिला पर्यटकांसाठी वैध असून, त्यांना त्यांचे ओळखपत्र सादर करणं आवश्यक आहे. निवासस्थानात चेक-इन करताना महिला पर्यटकांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. ही सवलत 1 ते 8 मार्चपर्यंतच लागू असेल. या सवलतीच्या अंतर्गत बुकिंगची रक्कम नॉन-रिफंडेबल आणि नॉन-हस्तांतरणीय आहे.

डिस्काउंट प्रोमो कोड फक्त एकदाच वापरता येणार

ही सवलत MTDC च्या लिज प्रॉपर्टीसाटी (आंबोली, त्र्यंबकेश्वर, तुळजापूर) केलेल्या बुकींगसाठी आणि इतर कोणत्याही OTA प्लॅटफॉर्मवरून केलेल्या बुकिंगसाठी वैध नाही. पर्यटक डिस्काउंट प्रोमो कोड फक्त एकदाच वापरू शकतात. या संधीचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी केलेल्या बुकिंगवर प्रोमो कोड लागू होणार नाही. या अटी व शर्ती कोणत्याही वेळी पूर्वसूचनेशिवाय बदलण्याचा अधिकार MTDC राखून ठेवले आहेत. हा प्रोमो कोड वापरून एका वेळी फक्त एक खोली बुक केली जाऊ शकते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज