Top 5 Movie: ‘बर्लिन ते द बकिंगहॅम मर्डर्स’ 2024 मध्ये पाहण्यासारखे टॉप 5 थ्रिलर

Top 5 Movie: ‘बर्लिन ते द बकिंगहॅम मर्डर्स’ 2024 मध्ये पाहण्यासारखे टॉप 5 थ्रिलर

2024 Top 5 Thriller Movie : ॲक्शन आणि कॉमेडी अश्या विविध चित्रपटाची सगळयांना क्रेझ असते. 2024 मध्ये हे खास थ्रिलर्स आहेत, जे प्रेक्षकांचं वेगळ्या पद्धतीने मनोरंजन करणार आहेत. थ्रिलर चित्रपट त्याची गोष्ट, दृश्य प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतात. उत्सुकता आणि उत्साह वाढवणारे हे चित्रपट कायम प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात. जर तुम्ही 2024 मध्ये थ्रिलर-चित्रपट बघण्यासाठी उत्सुक असाल तर हे चित्रपट नक्कीच तुमचं मनोरंजन करणार आहेत.

2024 मध्ये पाहण्यासारखे टॉप 5 थ्रिलर चित्रपट: अपारशक्ती खुरानाचा- बर्लिन
अपारशक्ती खुराना ( Aparshakti Khurana) त्याच्या आगामी थ्रिलर ‘बर्लिन’साठी (Berlin Movie) उत्सुक आहे. अतुल सभरवालसोबत तो बर्लिनमध्ये दिसणार आहे. एका मूकबधिर माणसाच्या भूमिकेत तो दिसणार आहे ज्याला गुप्तहेर म्हणून आरोपी करून अटक केली जाते. कथा जसजशी उलगडत जाते आणि वास्तव समोर येते तसतशी उत्सुकता शिगेला पोहोचते. बर्लिनने इश्वाक सिंग, कबीर बेदी आणि राहुल बोस यांच्यासह अपारशक्तीची बेस्ट टीम यात बघायला मिळणार आहे.

करीना कपूर – द बकिंगहॅम मर्डर्स:  करीना कपूर (Kareena Kapoor) स्टारर ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ (The Buckingham Murders) हा वर्षातील सर्वात अपेक्षित थ्रिलर आहे. करीना एका त्रासलेल्या पोलिसाची कहाणी सांगते ज्याच्या ताज्या केसमुळे वेदनादायक आठवणी परत येतात आणि प्रख्यात दिग्दर्शक हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेला हा थ्रिलर आहे. रिलीज होण्यापूर्वीच द बकिंगहॅम मर्डर्स जागतिक स्तरावर आधीच चर्चेत आहे.

यामी गौतम – आर्टिकल 370: यामी गौतम (Yami Gautam) तिच्या चित्रपटांच्या काळजीपूर्वक निवडीसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि आर्टिकल 370 (Article 370 ) सह अभिनेत्री पुन्हा एकदा कम बॅक करताना दिसणार आहे. ही अभिनेत्री दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे यांच्यासोबत काम करत असून ती प्रियमणी आणि अरुण गोविल यांच्यासोबत दिसणार आहे. आर्टिकल 370 मध्ये यामी गौतमीचा प्रयत्न 2016 च्या काश्मीर अशांततेनंतर दहशतवादावर कारवाई करण्याचा आहे. यामुळे आर्टिकल 370 हा वर्षातील सर्वाधिक-प्रतीक्षित थ्रिलर बनणार आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे 4000 भाग पूर्ण; सेटवर जंगी सेलिब्रेशन, बबिता जीने शेअर केली खास पोस्ट

अजय देवगणचा – शैतान:  अजय देवगण (Ajay Devgan) शैतान (Shaitaan) नावाच्या आगामी हॉरर-थ्रिलरमध्ये आर माधवन आणि ज्योतिकासोबत काम करत आहे. त्याचा टीझर नुकताच रिलीज झाला. हा चित्रपट सगळ्यांचं लक्ष पडद्यावर खिळवून ठेवणारं यात शंका नाही. काळ्या जादूभोवती फिरणारा हा थ्रिलर भयपटात वेगळा कसा ठरणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. विकास बहल दिग्दर्शित, शैतान 8 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

आलिया भट्टचा – जिगरा: आलिया भट्ट (Alia Bhatt) ही सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने दिग्दर्शक वासन बालासोबत ‘जिगरा’ (Jigra) या थ्रिलर चित्रपटासाठी काम केले आहे. कारण अभिनेत्री सध्या त्याचसाठी शूटिंग करत आहे. हा चित्रपट आलिया भट्टच्या तुरुंगातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नांभोवती फिरतो, या वर्षी तो पाहावा असा थ्रिलर बनतो, अशी अपेक्षा आहे..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज