Ramdas Kadam on Uddhav Thackeray : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून मुंबईत जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाविजय साजरा करण्यासाठी मालाड पूर्वेत कुरार व्हिलेज मध्ये शिवसैनिकांचा मेळावा आणि नवनियुक्त (Ramdas Kadam ) आमदार यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
दिंडोशी विभाग प्रमुख वैभव भराडकर यांच्याकडून याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या उपस्थितीमध्ये या सत्कार सोहळा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कुठंपर्यंत ठेवायचं याचा विचार करावा, असं मत व्यक्त केलं.
उद्धव ठाकरे की राज ठाकरे; अजित पवार की एकनाथ शिंदे, रॅपीड प्रश्नांवर फडणवीसांचे फायर उत्तरं
शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. गेल्या 35 वर्ष महानगरपालिका उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये आहे. या 35 वर्ष मध्ये मुंबईत जवळपास 60 टक्के मराठी माणूस हा मुंबईचा बाहेर फेकला गेला. याला जबाबदार उद्धव ठाकरे नाहीत का? उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांना उद्ध्वस्त करून टाकलं, हे वास्तव आहे,असं रामदास कदम म्हणाले.
भविष्यामध्ये उद्धव ठाकरे यांना मराठी माणसाचे नाव घेण्याच्या अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांना कालच पत्रकार परिषद घेतली हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत, ज्यांनी शिवसेनाप्रमुख प्रमुखांचे विचार पायदळी तुडवले, ज्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी बेईमानी केली. ज्यांनी काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी गद्दारी केली. त्या उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकामध्ये जाण्याचं आणि पाय ठेवण्याचा नैतिक अधिकार नाही, असं रामदास कदम म्हणाले.
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाला विनंती करणार आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदापासून उद्धव ठाकरे यांची हकालपट्टी झाली पाहिजे. त्या स्मारकाचा आणि उद्धव ठाकरेंच्या काही संबंध राहता कामा नये. जर उद्धव ठाकरे स्मारकामध्ये गेले तर वरून शिवसेनाप्रमुखांना किती वेदना होईल की ज्याने माझ्या विचारांशी गद्दारी केली तो माझ्या मुलगा माझा स्मारकामध्ये कसा येऊ शकतो, असं रामदास कदम म्हणाले.
आदित्य ठाकरे प्रत्येक वेळी देवाभाऊ, देवाभाऊ करत देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटत आहेत त्यांना हात जोडत आहे. उद्धव ठाकरे एवढा मोठा फुलांचा बुके घेऊन जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतात. कालपर्यंत तू राहशील नाहीतर मी असं देवाभाऊ बद्दल बोलणारे उद्धव ठाकरे अचानक कसे बदलले, असं रामदास कदम म्हणाले. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना कुठपर्यंत ठेवायचं हे देवेंद्र फडणवीस यांनी विचार करावा, असं म्हटलं.