Rana Jagjitsinh Patil Campaign : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मोक्याची ३१ एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पदरात पाडून घेतली आहे. या ठिकाणी ३०० तज्ञ डॉक्टर उपलब्धता असलेले (Rana Jagjitsinh Patil ) सुसज्ज आणि सर्वात मोठे वैद्यकीय संकुल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यात ४३० कोटी रूपयांचा निधी देखील मंजूर झाला आहे अशी माहिती तुळजापुरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. ते प्रचार दौऱ्यात बोलत होते.
महाविकास आघाडीच्या त्रुटींमुळे रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेला मान्यता मिळवून घेतली आणि प्रलंबित असलेल्या वैद्यकिय महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्नही आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने निकाली काढला. आपल्या पाठपुराव्याला महायुती सरकारच्या पाठबळामुळे यश आले आहे असं राणाजगजितसिंह पाटील म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विम्यासाठी कोर्टात धाव घेतली; राणाजगजितसिंह पाटलांची प्रचार दौऱ्यात माहिती
आपल्या अनेक वर्षांच्या मागणीच्या अनुषंगाने तत्कालीन वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी २०१७ मध्ये धाराशिव येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाची घोषणा केली होती. त्यानंतरच्या हिवाळी अधिवेशनात तत्कालीन सुजितसिंह ठाकूर यांनी विधानपरीषदेत व आपण विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना गिरीश महाजन साहेबांनी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची सभागृहात घोषणा केली होती.
त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयासाठी पूरक असणार्या सर्व अनुषंगिक बाबींची पूर्तता व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अधिकृत ठराव घेऊन ४ एकर जागा आपण वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजूर केली. एम.सी.आय.च्या अटींनुसार लागणारी जमीन उपलब्ध करून दिली. ३० कोटी रूपये खर्चून इमारत देखील बांधण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असलेला वस्तुनिष्ठ प्रस्ताव गिरीष महाजन यांच्याकडे सादर केला. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि अनेक त्रुटी राहिल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रियेवर गंडांतर आलं असंही ते म्हणाले आहेत.