अनेक प्रकल्पांतून 35 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती करणार; राणाजगजितसिंह पाटील यांचं आश्वासन

  • Written By: Published:
अनेक प्रकल्पांतून 35 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती करणार; राणाजगजितसिंह पाटील यांचं आश्वासन

Ranajgajitsinh Patil : विकासाची दृष्टि ठेवून व्यापक लोकहितासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणे ही आपल्या कामाची पध्दत आहे. तत्कालीन ठाकरे सरकारमुळे आपल्या जिल्ह्यातील अनेक लोकहिताच्या (Ranajgajitsinh Patil) प्रकल्प आणि योजनांना मोठी खीळ बसली होती. मागील 24 महिन्यांच्या कालावधीत सतत पाठपुरावा करून जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेले अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजना आपण पूर्णत्वाच्या दिशेने पुढे नेले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. ते प्रचारसभेस बोलत होते.

जिल्ह्यातील कौशल्य असलेल्या तरूणांना जिल्ह्यातच काम मिळावे, यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे. पर्यटन विकास, नवीन रेल्वेमार्ग, तामलवाडी एमआयडीसी आणि कौडगाव येथील टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून पुढील काळात 35 हजाराहून अधिक रोजगार निर्मितीचे आपले उद्दिष्ट आता नजरेच्या टप्प्यात आल आहे असंही ते म्हणाले. तुळजापूर येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या युवकांच्या मेळाव्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महायुतीच्या कार्यकाळात तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या अनेक जनहितांच्या प्रकल्प आणि योजनांची माहिती दिली.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला वैश्वीक पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी आपण स्वप्न पाहिले. त्याचा पाठपुरावा केला. केंद्रातील आपले सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने त्याला पाठबळ दिले आणि आता दोन हजार कोटी रूपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम झाला आहे. तुळजापूर शहरात राज्य, देश आणि जगभरातून आलेल्या दहा हजाराहून अधिक पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था करण्याचा आपला प्रयत्न आहे. मुक्कामी आलेल्या भाविकांची संख्या वाढल्यानंतर होणारी आर्थिक उलाढाल तुळजापूर शहर आणि परिसराच्या अर्थकारणाला मोठी गती देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विकासकाम झालीत अन् पुढं करत राहणार तुम्ही साथ द्या; राणाजगजितसिंह पाटलांचं मतदारांना आवाहन

त्यातच सोलापू-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचे काम पुढील 24 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आपण बाळगले आहे. त्यामुळे दळणवळणाची सक्षम यंत्रणा उपलब्ध होईल आणि त्यातूनही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती अपेक्षित आहे. तुळजापूर शहर एक संपन्न आणि समृध्द शहर म्हणून पुढील काळात देशातील नकाशावर आल्याखेरीज राहणार नाही. त्यादिशेने सुरू असलेल्या आपल्या प्रयत्नांना आता आकार आला आहे. आपल्या हक्काचे पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णेचे पाणी डिसेंबरअखेरपर्यंत तुळजाभवानी देवीच्या चरणी दाखल होत आहे. त्यातून 14 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र ओलिताखाली येणार आहे असंही ते म्हणाले.

तामलवाडी येथे 370 एकर क्षेत्रावर एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राज्यातील 150 पेक्षा अधिक उद्योजकांनी तामलवाडी एमआयडीसीत गुंतवणूक करण्यासाठी उत्स्फूर्तपणे तयारी दाखवली आहे. या एमआयडीसीत 12 हजार नोकर्‍या तयार होणार आहेत. त्याचबरोबर अप्रत्यक्ष रोजगाराची संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. कौडगाव येथे दीड हजार एकरावर एमआयडीसी निर्माण करण्याचे आपण पाहिलेले स्वप्न आता प्रत्यक्षात साकारू लागले आहे. महाजनकोच्या माध्यमातून त्या ठिकाणी 50 मेगावॅट प्रकल्पाचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वितही झाला आहे. 2019 साली महाजनादेश यात्रेदरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौडगाव येथे राज्यातील पहिली टेक्निकल टेक्सटाईल पार्क जाहीर केली होती. मात्र त्यानंतर ठाकरे सरकारने त्यासाठी काहीच केले नाही असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube