Maharashtra Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. भारतीय पोलिस सेवेतील तब्बल 10 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सरकारने जारी केले आहेत. यात अमिताभ गुप्ता, सुहास वारके, रंजन कुमार शर्मा यांचा समावेश आहे. रंजन कुमार शर्मा (Ranjan Kumar Sharma) यांची पुणे शहर पोलीस सह आयुक्तपदी बदली करण्यात आली.
रंजन कुमार शर्मा पुण्याचे पोलीस सहआयुक्त, राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
रंजन कुमार शर्मा हे भारतीय पोलीस सेवेतील २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. काही महिन्यांपूर्वी शर्मा यांनी पुण्यात अपर पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार पाहिला होता. सध्या ते नाशिक पोलिस परिक्षेत्राचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक होते. हसतमुख अधिकारी म्हणून रंजन शर्मा यांची ओळख आहे. त्यांनी गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अधीक्षक म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे. आता त्यांची पुण्याच्या शहर पोलीस आयुक्तपदी बदली झाली.
बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची यादी
1. सुनील रामानंद (अपर पोलीस महासंचालक, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान, पुणे) यांची आता मुंबईत अपर पोलीस महासंचालक (नियोजनव समन्वय) या पदावर बदली झाले आहे.
2. तर प्रवीण साळुंके (अपर पोलीस महासंचालक, विशेष कृती, मुंबई) यांची आता अपर पोलीस महासंचालक लोकमार्ग, मुंबई येथे बदली करण्यात आली
3. सुरेश मेखला (नियंत्रक, वैध मापन शास्त्र, मंबई) यांची अपर पोलीस महासंचालक, वाहतूक, मुंबई या पदावर बदली झाली.
4. दीपक पांडे (अपर पोलीस महासंचालक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक, मुंबई) यांची पुण्यात अपर पोलीस महासंचालक (पोलीस दळणवळ, माहिती तंत्रज्ञान) या पदावर नियुक्ती झाली.
जयसूर्या पुन्हा देणार भारताला चॅलेंज; मालिकेआधी श्रीलंकेच्या हेड कोचपदी नियुक्ती
5. अमिताभ गुप्ता (अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा, पुणे) यांची मुंबई अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) या पदावर बदली झाली
6. सुहास वारके (विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यस्था, मुंबई) यांची महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली केली.
7. नागपूरच्या पोलीस सह आयुक्त अश्वती दोरजे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (नागरी हक्क संरक्षण) पदावर मुंबईत बदली झाली.
8. छेरिंग दोरजे (विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र) यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून मुंबईत बदली झाली. आधी या पदावर सुहास वारके कार्यरत होते.
9. रंजन कुमार शर्मा (विशेष पोलीस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे) यांच्याकडे आता पुण्याच्या पोलीस सह आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली.
10. डी. के. पाटील- भुजबळ (विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अभिलेख विभाग) यांची आता विशेष पोलीस महानिरीक्षक (नागपूर परिक्षेत्र) या पदावर बदली करण्यात आली. आधी या पदावर छेरिंग दोरजे हे कार्यरत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची चर्चा आहे.