Download App

‘शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय…,’ तुरूंगातून बाहेर येताच, रणजित कासलेंचा थेट अजित पवारांना धमकीवजा इशारा

Ranjit Kasle Warning To Ajit Pawar On Jai Pawar : बीडमध्ये वातावरण आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर रणजित कासले यांनी (Ranjit Kasle) थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धमकीवजा इशारा दिला आहे. अजित पवार (Ajit Pawar) माझ्या मागे लागले आहेत. शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय. मी जय पवारला कोणत्या हालतमध्ये सोडलंय, स्टेशन डायरी माझ्याकडे (Beed News) आहे.

प्रिंटमध्ये-फोटोमध्ये आहे. गरज लागली की एक-एक पत्ता ठेवायचा, सगळंच देऊन मोकळं व्हायचं नाही, असं सूचक वक्तव्य सुद्धा रणजित कासले यांनी केलंय. माझ्याकडे अजून पत्ते शिल्लक आहे. तीन पत्त्यांमध्ये एक-एक पत्ते ( Maharashtra Politics) शिल्लक ठेवले आहेत. वेळ आल्यानंतर उघडणार. जय पवार यांना मरीन ड्राईव्हवरून कोणत्या हालतमध्ये घरी सोडलं होतं, याचा देखील पुरावा माझ्याकडे आहे, असा इशारा त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे.

भारतानं रचला इतिहास! जपानला पछाडत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; आता तीनच देशांचं आव्हान

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा बीडच्या कारागृहात आहे. तेथे त्याला व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा रणजीत कासले यांनी केला आहे. स्पेशल चहा, चांगल्या चपात्या, 25 हजारांची खरेदी असे अनेक आरोप बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याने व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत केले आहे.

कासलेच्या या व्हिडिओमुळे पोलीस प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. स्टंटबाजी करायची असती तर वाल्मिक कराडचं एनकाउंटर केलं असतं, मला पन्नास करोड मिळाले असते, असं देखील त्यांनी या व्हिडिओत म्हटलंय.

चिकन, स्पेशल चहा, झोपायला 6 ब्लॅंकेट… वाल्मिक कराडला जेलमध्ये VIP ट्रिटमेंट, तुरुंगवारी करून परतलेल्या कासलेंचा गंभीर आरोप

रणजित कासले याला साबयर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना गुजरातमध्ये जाऊन आरोपींशी आर्थिक तडजोड केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलं होतं. नंतर त्याच्यावर बडतर्फीची देखील कारवाई करण्यात आली. त्याला आठवडाभरापूर्वी जामीन मिळाला असून त्यानंतर त्याने शनिवारी त्याने व्हिडिओ शेअर करत आरोपसत्र सुरु केल्याचं पाहायला मिळतंय.

 

follow us