Ravi Rana : उद्धव ठाकरे यांचे दैवत राहुल गांधी आहेत की स्वातंत्र्यवीर सावरकर ?

अमरावती : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी माझे दैवत स्वातंत्र्यवीर सावरकर आहे असं सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी आहे. ते जनतेची दिशाभूल करत आहे. तर महाविकास आघाडीची लाचारी उद्धव ठाकरे करत असून त्यांनी स्पष्ट करावे की त्यांचे दैवत राहुल गांधी आहेत की स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. त्यांनी भूमिका स्पष्ट करून जनतेतील […]

Uddhav Thackeray Ravi Rana

Uddhav Thackeray Ravi Rana

अमरावती : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी माझे दैवत स्वातंत्र्यवीर सावरकर आहे असं सांगितलं. मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी आहे. ते जनतेची दिशाभूल करत आहे. तर महाविकास आघाडीची लाचारी उद्धव ठाकरे करत असून त्यांनी स्पष्ट करावे की त्यांचे दैवत राहुल गांधी आहेत की स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. त्यांनी भूमिका स्पष्ट करून जनतेतील संभ्रम दूर करावा, असा टोला अमरावती जिल्ह्यातील बडनेरचे आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

पवारांचं नाव घेतलं की गोप्याच्या XXXला आग लागली समजा, मिटकरींचा हल्लाबोल – Letsupp

रवी राणा म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांची निष्ठा ही महाविकास आघाडीत पूर्णपणे एकरूप झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे पूर्णपणे हिंदुत्व विसरून गेले आहेत. त्यांची निष्ठा आता पूर्णपणे काँग्रेसच्या विचारांची झाली आहे. त्यामुळे त्यांची निष्ठा ही राहुल गांधी यांच्याशी आहे, हे आता महाराष्ट्रातील जनतेला चांगले माहिती झाले आहे. उद्धव ठाकरे हे केवळ जाहीर सभांमधून जनतेची दिशाभूल करत आहेत.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे आमचे दैवत आहे, असे जाहीर सभांमधून केवळ घोषणा करायच्या. पण महाविकास आघाडी सोडायची नाही. काँग्रेसला चिटकून राहायचे ही दुटप्पी भूमिका आहे. वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांच्याशी कधी फारकत घेणार आहे, हे एकदा जाहीर करा आणि केवळ जाहीर सभांमधून जनतेची दिशाभूल करणे बंद करा, असा टोला आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना यावेळी लगावला आहे.

(230) Uddav Thackeray on Rahul Gandhi : भरसभेत ठाकरेंनी टोचले राहुल गांधींचे कान | LetsUpp Marathi – YouTube

Exit mobile version