Download App

Video : राजू शेट्टींनी माझे पंख छाटण्याचे प्रयत्न करु नयेत! तुपकरांचा नेतृत्वाला थेट इशारा

बुलढाणा : नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत, परंतु नेतृत्वच जर कार्यकर्त्यांचे पंख छाटत असतील तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. त्यामुळे नेतृत्वाने माझे पंख छाटण्याचे प्रयत्न करु नयेत, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant tupkar) यांनी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना दिला आहे. लेट्सअप मराठीशी त्यांनी विशेष संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, तुपकर आणि शेट्टी यांच्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडल्याने ते दुसऱ्यांदा स्वाभिमानी शेतकरी संघटना सोडण्याच्या उंबरठ्यावर आहेत का असा सवाल विचारला जात आहे? या प्रश्नाचेही तुपकर यांनी उत्तर दिले. (Ravikant tupkar Swabhimani Shetkari Saghtana raju shetty ravikat tupkar leave swabhimani saghtana)

Tags

follow us