विकासकामांना गती देण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं रवींद्र चव्हाण यांचं आवाहन

डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्रमांक 22 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार भाषण.

Untitled Design   2026 01 11T190521.831

Untitled Design 2026 01 11T190521.831

Ravindra Chavan’s appeal to elect Mahayuti candidates : डोंबिवली महापालिकेतील प्रभाग क्रमांक 22 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार भाषण केलं. राज्यात शिवसेना-भाजप महायुतीचं सरकार असल्याने या संपूर्ण प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी महायुतीचीच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

रवींद्र चव्हाण म्हणाले की, विरोधकांना मतदान केल्यानंतर या प्रभागात एक इंचही विकासकाम होऊ शकणार नाही. कारण येथील महापौर देखील महायुतीचाच असणार आहे. विरोधी पक्षाचे नगरसेवक निवडून आल्यास त्यांना निधी मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला. केवळ नगरसेवक व्हायचं आहे म्हणून काही उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत, मात्र महायुतीचे उमेदवार हे नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या उद्देशाने निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं.

गंगेचे पाणी पिणार नाही म्हणणारे लोक गोदातीरी येऊन भाषण करतात; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

पुढील पिढीचं भविष्य उज्वल करायचं असेल, तर महायुतीच्या उमेदवारांना निवडून देणं आवश्यक आहे, असं आवाहन त्यांनी केलं. विरोधक सतत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील, पण नागरिकांनी सजग राहावं, असंही ते म्हणाले. महिलांशी संवाद साधताना चव्हाण यांनी सांगितलं की, घरात निर्णय घेणाऱ्या महिलांनीच मतदानाचा निर्णय घ्यावा आणि तो महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने असावा. केंद्रात आणि राज्यात महायुतीचं सरकार असून, गावापासून शहरापर्यंत विकासकामांना गती देण्याचं काम सुरू आहे.

आसपासचे सर्व रिंगरोड जोडले जाणार असून मेट्रोचं जाळंही विस्ताराला जाणार आहे. आरोग्याच्या क्षेत्रात पंतप्रधानांच्या सहकार्याने मोठे बदल होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गरीब आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी महायुतीचं सरकार सातत्याने काम करत असल्याचा दावा त्यांनी केला. येत्या १५ तारखेला विक्रमी मतदान करून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा, असं आवाहन करत रवींद्र चव्हाण यांनी आपलं भाषण संपवलं.

Exit mobile version